पुणे जिल्हा | एनकाउंटरनंतर दौंड शिवसेनेकडून आनंदोत्सव

यवत, (वार्ताहर)- बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत झालेल्या मृत्यूनंतर दौंड तालुका शिवसेनेच्या वतीने चौफुला येथील शिवसेना कार्यालयासमोर फटाके फोडत आणि पेढे वाटत ठाणे पोलिसांचे आभार मानले.
एनकाउंटरनंतर दौंड तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांनी पोलिसांचे आभार मानत फटाके फोडले आणि पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
स्थानिक शिवसेना नेत्यांनी या कारवाईचे स्वागत करीत सांगितले की, हा वाईट प्रवृत्तींच्या पराभवाचा विजय आहे. पोलिसांनी समाजातील गुन्हेगारीवर कठोर कारवाई केली आहे.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख विजयसिंह चव्हाण, शिवसेना तालुका संघटक सचिन दोरगे, तालुका क्षेत्रप्रमुख हनुमंत निगडे, महिला आघाडीच्या छायाताई जगताप, उप तालुकाप्रमुख सागर शितोळे,
तालुका प्रसिद्धीप्रमुख राहुल फडके, शिवसेना विभाग प्रमुख रमेश अवचट, शिवसेना शाखाप्रमुख चेतन पासलकर, शिवसेनेचे दत्तात्रय चव्हाण, प्रशांत खराडे, दिलीप दोरगे, शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते.

