दौंड: दिव्यांग बांधवांसाठी शनिवारी चौफुला येथे कृत्रिम अवयवांचे शिबिर

नांदूर (ता. दौंड) Prosthetic limb camp – दौंड तालुक्यातील श्री बोरमलनाथ मंदिर चौफुला येथे शनिवारी (दि. 24 फेब्रुवारी) रोजी दिव्यांग बांधवांच्या वेदना कमी व्हाव्यात, त्यांना चांगल्या दर्जाच्या व नव्या तंत्रज्ञानाच्या साधनांची आणि अत्याआधुनिक कृत्रिम अवयवांची साथ मिळावी, या हेतूने नाव नोंदणी व तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. यातून दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव आणि साधनांची साथ मिळणार आहे.
शिबिरात दौंड पंचायत समितीचे माजी उपसभापती सुशांत दरेकर व मित्रपरिवार म्हणाले की, दिव्यांग बांधवांचे पुनर्वसन हा समाजासाठी मूलभूत जाणिवेचा भाग असून, यासाठी प्रत्येकाने जबाबदारी घेणे गरजेचे आहे. त्यांच्यात आत्मविश्वास व बळ निर्माण करण्याबरोबरच त्यांना हक्क मिळवून देण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे.
शिबिरात दिव्यांग बांधवांच्या अत्याआधुनिक कृत्रिम अवयवांसाठी मापे घेण्यात येणार असून काही दिवसांत साधने व कृत्रिम अवयवांचे वाटप केले जाणार आहे, अशी माहिती दरेकर ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे.





