Shriya Pilgaonkar | मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या अभिनयाने त्यांनी सिनेसृष्टीत एल वेगळे स्थान निर्माण केले आहे. अनेक मुलाखतीतून सचिन पिळगावकर त्यांचे शूटिंग दरम्यानचे किस्से सांगितले. मात्र त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांना सोशल मिडियावर प्रचंड ट्रोल केले जाते. सचिन पिळगावकर यांच्या ट्रोलिंगवर त्यांची लेक श्रिया हिनं पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. एका मराठी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत श्रिया म्हणाली, “या सगळ्या गोष्टी खेदजनक आहेत. पण आम्हा लोकांना ट्रोलिंगची इतकी सवय झाली आहे की, आता त्याबद्दल काहीच वाटत नाही. ट्रोलर्सना खरंतर काहीच काम नसतं. म्हणून ते आम्हा कलाकारांना ट्रोल करतात.” Shriya Pilgaonkar | “शेवटी माझ्या बाबांना मायबाप प्रेक्षकांकडून अमाप प्रेम मिळालं आहे. त्यापुढे हे ट्रोलिंग काहीच नाही. लक्ष वेधून घेण्यासाठी ट्रोलर कोणत्याही थराला जाऊ शकतात. सोशल मीडियाचं जग असंच असतं. त्यामुळे सोशल मीडियाच्या गोष्टी फार मनावर नाही लावून घ्यायच्या. कृतज्ञ राहून चांगलं काम करत राहायचं,” असंही श्रिया म्हणाली. Shriya Pilgaonkar | दरम्यान, श्रियाने अनेक हिंदी सिनेमा आणि वेबसीरिजमध्येही काम केलं आहे. अलिकडेच तिची ‘मंडाला मर्डर्स’ ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यातील तिच्या भूमिकेचे अनेकांकडून कौतुक करण्यात आले. हेही वाचा: मनसेची होणार ‘मविआ’त एन्ट्री? ‘मातोश्री’वर काँग्रेस नेत्यांसोबत उद्धव ठाकरेंची चर्चा, दिल्लीतून होणार निर्णय?