Dasra Melava BKC Live : मेळाव्याच्या काही तास आधी मुख्यमंत्री शिंदेंचं आणखी एक ट्विट…

मुंबई : मुंबईमध्ये आज दसऱ्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मेळावा होत आहे. यासाठी राज्यभरातील वेगवेगळ्या भागांमधून दोन्ही गटांचे समर्थक मुंबईत दाखल झाले आहेत. दोन्ही गटाचा दसरा मेळावा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे.
दसरा मेळाव्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेतील ओळींचे ट्विट मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे. त्यांनी म्हटले आहे की,”” मेरे बेटे, बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे, जो मेरे उत्तराधिकारी होंगे, वो मेरे बेटे होंगे “- हरिवंशराय बच्चन.” आणि मुख्यमंत्री शिंदे यांनी #विचारांचेवारसदार असे देखील लिहले आहे.
” मेरे बेटे, बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे, जो मेरे उत्तराधिकारी होंगे, वो मेरे बेटे होंगे “- हरिवंशराय बच्चन.#विचारांचेवारसदार
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 5, 2022
तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी मेळाव्यातील भाषणाचा ट्विटमधून ट्रेलर सुध्दा ट्विट केला आहे.
विकासाच्या यात्रेत देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी मा.बाळासाहेबांचे विचार महत्वाचे आहेत. माय-बाप जनतेचं कल्याण साध्य करण्यासाठी आज आपण संकल्प करूयात, मा.बाळासाहेबांच्या विचारांचं सोनं लुटूयात बीकेसी मैदानावर.
दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा….#चला_BKC #दसरा_मेळावा pic.twitter.com/Hxu95zmWXI— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 5, 2022
ट्विटमधून ट्रेलर ट्विट करत दसऱ्याच्या शुभेच्या देताना त्यांनी म्हटले आहे की, “विकासाच्या यात्रेत देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी मा.बाळासाहेबांचे विचार महत्वाचे आहेत. माय-बाप जनतेचं कल्याण साध्य करण्यासाठी आज आपण संकल्प करूयात, मा.बाळासाहेबांच्या विचारांचं सोनं लुटूयात बीकेसी मैदानावर. दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा”



