दर्शना पवार हत्याप्रकरण : “दर्शनाच्या हत्येनंतर आरोपी राहुल केवळ फरारच झाला नाही, तर त्याने प्रवासात…”, तपासात धक्कादायक खुलासे

पुणे : एमपीएससी परीक्षेत राज्यात तिसऱ्या आलेल्या दर्शना पवारच्या हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी कसून तपस सुरु केला केला असून त्यात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. तपासात राहुल हंडोरेने त्याच्या मैत्रिणीचा खून केल्यानंतर पोलिसांना गुंगारा केल्याचा प्रयत्न समोर आले आहेत. पुणे ग्रामीण पोलीस दलातील एका अधिकाऱ्याने याबाबत एका इंग्रजी वर्तमानपत्राने घटनाक्रम सांगितला आहे.
पोलिसांनी या प्रकरणाविषयी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल हंडोरेने केवळ पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही, तर त्याने पोलिसांची दिशाभूल व्हावी म्हणून प्रयत्न केले. १८ जूनला दर्शनाचा मृतदेह आढळल्यानंतर राहुल हंडोरेने पुणे सोडलं आणि रेल्वेने प्रवास करण्यास सुरुवात केली. तो आधी सांगलीला गेला. तेथून तो गोव्याला गेला. आरोपी राहुल गोव्यातच थांबला नाही, तर पुढे चंदीगड आणि तेथून पश्चिम बंगालमधील हावडा येथे गेला.
पुढे पोलिसांनी सांगितले कि,”वरवर पाहता आरोपी राहुलचा हा प्रवास मोघम वाटत असला, तरी तो तसा नव्हता. त्याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी प्रयत्न केले. तो हावड्यावरून मुंबईला आला. या संपूर्ण रेल्वे प्रवासात त्याचा मोबाईल बंद होता.” पुढे आरोपी राहुल हंडोरेने या काळात इतरांकडून फोन घेऊन आपल्या कुटुंबाला आणि मित्रांना पाचवेळा कॉल केले. तो प्रवासात स्थानिक लोकांकडे मदतीची विनंती करत कुटुंबाला कॉल करण्यासाठी फोन करायचा. पोलिसांना त्याच्या कुटुंबाकडून या नंबरवरची माहिती मिळाल्यानंतर या नंबरवर पुन्हा कॉल करण्यात आले. त्यानंतर या प्रवाशांनी रेल्वेने प्रवास करणाऱ्या आणि कुटुंबाला कॉल करण्यासाठी फोन मागणाऱ्या लोकांनी राहुल हंडोरेची माहिती दिली.
या सर्व घटनाक्रमावरून हंडोरे केवळ फरार झाला नाही, तर त्याने पोलिसांना त्याचा माग लागू नये म्हणून प्रयत्न केले. त्याने प्रवासात लोकांकडे अन्न मागून खाल्ले. पोलिसांनी त्याच्या कॉलच्या आधारे तो कुठे आहे हे शोधून तपास पथकं पाठवली असती, तरी ते प्रयत्न अपयशी ठरले असते असा त्याने प्रयत्न केला. कारण तो इतरांच्या फोनवरून कॉल करून लगेच ठिकाण बदलायचा, अशीही माहिती पोलिसांनी दिली.
अखेर आरोपी राहुल हंडोरे मुंबईतील अंधेरी रेल्वे स्टेशनवर येणार असल्याची माहिती समजल्यानंतर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आलं. तो अंधेरीहून पुण्याला येणार होता. दरम्यान, दर्शना पवारबरोबर ट्रेकला जाताना आरोपी राहुलने कटर किंवा ब्लेड नेलं होतं का याचाही पोलीस तपास करत आहेत.





