Omraje Nimbalkar : भोवताली दाटला अंधार…; ‘फादर्स डे’ निमित्त ओमराजेंची भावूक पोस्ट; वडिलांसोबतचा शेअर केला जुना फोटो
Omraje Nimbalkar : २० वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर आणि कोर्टाच्या निकालानंतर ओमराजेंच्या भावना व्हिडिओद्वारे स्पष्ट

Omraje Nimbalkar : धाराशीवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. काल २० जून २०२६ रोजी वडील पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. २० वर्षानंतर लागलेला हा निकाल ओमराजेंसह त्यांच्या कुटूंबाला हा धक्का मानला जात आहे.
याचदरम्यान ‘फादर्स डे’निमित्त पवनराजे निंबाळकर यांच्या आठवणीत ओमराजे निंबाळकर यांनी व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी” या गाण्याच्या ओळींनी अनेकांचे लक्ष वेधले आहे. Omraje Nimbalkar
ओमराजे निंबाळकर यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओच्या सुरुवातीला त्यांचे दिवंगत वडील पवनराजे निंबाळकर यांच्यासोबतचा त्यांचा एक जुना फोटो दिसतो. या व्हिडिओला भावूक करणाऱ्या गाण्याच्या ओळी जोडण्यात आल्या आहेत.
भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी
सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी#happy father’s day pic.twitter.com/f8AxaLKmmZ— Omprakash Rajenimbalkar (@OmRajenimbalkr) June 21, 2026
पवनराजे निंबाळकर यांच्या आठवणींना उजाळा
तर या व्हिडीओसोबत त्यांनी भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी #happy father’s day असं लिहलं आहे. या भावनिक पोस्टमुळे धाराशीवसह संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा पवनराजे निंबाळकर यांच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.
या व्हिडिओमध्ये ओमराजे निंबाळकर हे भावूक अवस्थेत वडिलांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होताना आणि पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना दिसत आहेत. २० वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर आणि कोर्टाच्या निकालानंतर त्यांच्या मनात असलेल्या भावना या पोस्टच्या माध्यमातून स्पष्ट होत आहेत. Omraje Nimbalkar
दरम्यान, पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या निकालानंतर धाराशिवमध्ये कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून, “जर सर्व आरोपी निर्दोष असतील, तर पवनराजे निंबाळकर यांची हत्या कोणी केली?” असा सवाल समर्थकांकडून उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा:





