नृत्य अभ्यासक सुनील कोठारी यांचे हृदयविकाराने निधन

नवी दिल्ली – प्रख्यात नृत्य अभ्यासक आणि समीक्षक सुनील कोठारी यांचे रविवारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांना महिनाभरापुर्वी करोनाची लागण झाली होती. ते 87 वर्षांचे होते.
करोनासाठी ते घरातच उपचार घेत होते. मात्र त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर दिल्ली रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे त्यांची प्राणज्योत मालविली. मुंबईत जन्मलेल्या कोठारी हे भारतीय नृत्य शैलींचा अभ्यास सुरू करण्यापुर्वी चार्टड अकाउंटंट बनले होते. भारतातील नृत्य प्रकाराविषयी त्यांनी 20हून अधिक ग्रंथ लिहले.
सत्रीय डान्स ऑफ आसाम, न्यू डायरेक्शन इन इंडियन डान्स हे त्यांचे गाजलेले ग्रंथ होते. यीाशवाय भरतनाट्यम्, ओडिसी, छाऊ, कथल कुचीपुडी या नृत्यप्रकारांवरही विपूल लेखन केले. कोठारी यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार (1995), गुजरात संगीत नाटक अकादमीचा गौरव पुरस्कार (2000) पद्मश्री (2001) नृत्य समिक्षक संघ, न्युयॉर्ककडून जीवनगौरव पुरस्कार (2011) आदी परस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले होते.
संगीत नाटक अकादमीचे ते फेलो होते. सरकारने 27 जणांना दिलेली घरे खाली करण्याची नोटीस बजावली होती त्यात यांचाही समावेश होता.





