‘दामिनी’ने पुन्हा जिंकली चाहत्यांची मनं; अप्रतिम डान्स पाहून होताल थक्क

Meenakshi Sheshadri Dance Video| अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांनी चित्रपटसृष्टीतील 80-90 चा काळ गाजवला. आपल्या सौंदर्य, नृत्यकौशल्य आणि अदांनी त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्याकाळात आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत त्यांचा समावेश होता.
पण त्यानंतर त्या चित्रपटसृष्टीपासून दुर राहाल्याचे पाहायला मिळाले. यातच आता मीनाक्षी यांचा डान्सचा व्हिडिओ समोर आला आहे. लावणी किंग आशिष पाटीलसोबत भरतनाट्यम नृत्य सादर करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मीनाक्षी यांनी स्वत: च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. आशिष पाटील आणि मीनाक्षी यांच्या घायाळ करणाऱ्या नृत्य मुद्रांनी चाहत्यांना अक्षरश: वेड लावलं आहे. वयाच्या साठीतही त्यांचा फिटनेस, अदा आणि अफलातून नृत्यकौशल्य तरुणाईला लाजवेल असेच आहे. दरम्यान, हा व्हिडिओ आशिष पाटीलच्या नव्या कलांगण डान्स स्टुडिओमध्ये शूट करण्यात आला आहे. Meenakshi Sheshadri Dance Video|
View this post on Instagram
यावेळी मीनाक्षी यांनी पांढरी सिल्क साडी आणि गोल्डन टेम्पल ज्वेलरी परिधान केली आहे. यासोबत त्यांनी आपल्या केसांमध्ये गजरा माळला आहे. या लूकमध्ये त्या प्रचंड सुंदर दिसत आहेत. सध्या हा पाहून नेटकऱ्यांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
या व्हिडिओवर कॅप्शन देत, आशिष पाटील म्हणतो, “खऱ्या दामिनी सोबत… मी स्वत: ला खूप भाग्यवान समजतो कारण मला सौंदर्यवती मीनाक्षी शेषाद्री यांच्यासोबत नृत्य करण्याची संधी मिळाली. खरोखर ही देवाची कृपा आहे. मी याआधी फक्त तुमचं नृत्य कौशल्य रूपेरी पडद्यावर पाहिलं होतं.”
पुढे त्याने लिहिले की “नृत्यदिग्दर्शन तसेच तुमच्यासोबत स्टेज शेअर करताना मी स्वत: ला खूप नशीबवान समजतो, मॅम फक्त तुमची नृत्यशैलीच नाही तर एक माणुस म्हणूनही तुम्ही तितक्याच सुंदर आहात. आगामी काळात आणखी व्हिडीओ करण्याची वाट बघत आहे.” दरम्यान, आशिष हा हिंदीसह मराठीतील लोकप्रिय नृत्य दिग्दर्शक आहे. Meenakshi Sheshadri Dance Video|
तर, मिनाक्षी यांच्या 1993 साली ‘दामिनी’ चित्रपटाला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. तेव्हापासून हिंदी सिनेसृष्टीत त्यांना दामिनी म्हणून ओळख मिळाली. याशिवाय त्यांनी ‘शहनशाह’, ‘आंधी तुफान’, ‘मेरी जंग’ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
हेही वाचा:





