साऊथ सुपरस्टारने भर कार्यक्रमात अभिनेत्रीला दिला धक्का

Nandamuri Balakrishna Troll| दक्षिणात्य अभिनेता नंदामुरी बालकृष्ण त्यांच्या चित्रपटांसह अन्य कारणामुळे देखील नेहमीच चर्चेत असतात. नंदामुरी बालकृष्ण हे दक्षिण भारतातील ज्येष्ठ अभिनेते असून ते राजकारणातही सक्रिय आहेत. सध्या त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. एका अभिनेत्री भर कार्यक्रमात ढकलून देत असल्याचे व्हिडिओत पाहायला मिळत आहे. त्यांची ही कृती नेटकऱ्यांच्या पसंतीस पडलेली नाही. यावरून सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात येत आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये ‘गँग्स ऑफ गोदावरी चित्रपटाच्या कार्यक्रमादरम्यान नंदामुरी बालकृष्ण स्टेजवर येताना दिसत आहेत. यावेळी मंचावर अनेक लोक आधीच उपस्थित होते. नेहा शेट्टीसोबत अभिनेत्री अंजलीही येथे होती.
यादरम्यान नंदामुरी अंजलीला स्टेजवर थोडी जागा तयार करण्यास सांगतात. पण साडी नेसल्यामुळे ती थोडी हळू चालत होती. त्यादरम्यान नंदामुरी बालकृष्ण अंजलीला ढकलतात. तेव्हा अंजली आश्चर्य चकित होते आणि हसते. परंतु त्यांची ही कृती नेटकऱ्यांच्या पसंतीस पडलेली नाही.
— Out of Context Telugu (@OutOfContextTel) May 29, 2024
या व्हिडिओवर कमेंट करत एका नेटकऱ्याने लिहिले की, ‘हा काय प्रकार आहे’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्याने लिहिले, ‘तुम्ही किमान वयाचा विचार करायला हवा होता’. आणखी एका नेटकऱ्याने ‘तुम्हाला लाज वाटली पाहिजे’ असे लिहिले आहे. अभिनेत्री अंजलीबद्दल बोलायचे झाले तर, तिने दक्षिणेतील अनेक हिट चित्रपटांध्ये काम केले आहे. कृष्ण चैतन्य दिग्दर्शित, ॲक्शन ड्रामा 31 मे 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. Nandamuri Balakrishna Troll|
हेही वाचा:
धक्कादायक..! भुसावळमध्ये कारवर अज्ञातांकडून अंधाधूंद गोळीबार; माजी नगरसेवकासह एकाचा मृत्यू





