Mrunal Thakur injured : ‘डकैत’चा अॅक्शन सीन पडला भारी! अभिनेत्री मृणाल ठाकूर जखमी; कपाळाला लागला मार, चाहत्यांना चिंता

Mrunal Thakur injured : सध्या अभिनेता अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या सन अॅाफ सरदार २ चित्रपटामुळे अभिनेत्री मृणाल ठाकूर चर्चेत आहे. यानंतर तिचा डकैत नावाच चित्रपट रिलीसाठी सज्ज होणार असल्याची माहिती होती. मात्र, या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान मृणालला दुखापत झाली आहे.
हैदराबादमधील एका अॅक्शन सीनच्या चित्रिकरणावेळी दुखापत झाली आहे. अभिनेता अदिवि शेष हाही यामध्ये जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादमध्ये या चित्रपटातील एक अॅक्शन सीन सुरू होता. या सीनच्या शुटिंगवेळी दोघांनाही दुखापत झाली आहे.
अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या कपाळाला मार लागल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे मृणालच्या चाहत्यांना तिची खूप काळजी वाटू लागली आहे. अभिनेता अदिवि शेषला सुद्धा कपाळावर थोडी दुखापत झाली आहे. यानंतर त्यांना प्राथमिक उपचार देण्यात आले असून, लगेचच पुन्हा शुटिंगला सुरुवात करण्यात आली. यामुळे दोघांचीही कामाप्रती असलेले समर्पण पाहून त्यांचे कौतुक केले जात आहे. अदिवि आणि मृणाल यांच्या ‘डकैत: एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या उत्कंठावर्धक टीझरने सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.
हा एक अॅक्शन आणि प्रेमकथेवर आधारित चित्रपट असणार आहे. या चित्रपटात अभिनेता अदिवि आणि मृणाल मुख्य भूमिकेत आहेत. २६ मे २०२५ या दिवशी या चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ही पहिली झलक प्रेक्षकांना खूप आवडवली आहे. यावर्षी डकैत रिलीज होणार आहे.





