दैनिक प्रभात ‘दीपस्वर’ – LIVE

Updated On:

पुनीत बालन ग्रुप प्रायोजित, दैनिक प्रभात ‘दीपस्वर’, पॉवर्ड बाय लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लिमिटेड आयोजित दैनिक प्रभातच्या ‘दीपस्वर’ या दिवाळी पहाट कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत! दैनिक प्रभात परिवारातर्फे दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा!

ही दीपावली तुम्हाला शांती, समृद्धी आणि सकारात्मकतेची जावो.. आपल्या स्थापनेच्या शताब्दीकडे वाटचाल करत असलेल्या दै. प्रभातची एक नवी स्वरभेट आपल्यासाठी!

दीप उजळतील सुखाचे रंग, सुरांनी बहरतील मनाचे अंग. प्रकाश, प्रेम, आणि सुरांनी नटलेल्या दैनिक प्रभातच्या ‘दीपस्वर’ या दिवाळी पहाट कार्यक्रमात आपणासारख्या जाणकार रसिकांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते!

या दिवाळीच्या पहाटेला, स्नेहाच्या लहरींसोबत सूरही सज्ज आहेत. सूरांच्या स्पर्शाने उजळलेली ही दिवाळी प्रेमाचे संदेश घेऊन आली ही पहाट नवी. आजच्या या मंगलमय क्षणी, हृषिकेश रानडे, स्व्प्नजा लेले आणि सन्मिता धापटे-शिंदे अशा नामांकित गायकांच्या आवाजात गुंफलेले सुमधुर गीतांचे तोरण, आपल्या सर्वांच्या आनंदात नवे रंग भरेल.

दीपावलीच्या सणाने जणू सारे जग उजळून निघते, तसेच हे सूर आपल्या जीवनात समाधानाची उधळण करतील. तर चला, या सुमधुर सुरांच्या संगतीत दिवाळीची सुरुवात करूया.

पुनीत बालन ग्रुप प्रायोजित, दैनिक प्रभात ‘दीपस्वर’, पॉवर्ड बाय लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लिमिटेड, आयोजित सुरांच्या या मैफलीत आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत!

आणखी संबंधित बातम्या

Diwali Pahat : गौतमी पाटीलनं गाजवली ठाणेकरांची दिवाळी... जितेंद्र आव्हाड आणि सुषमा अंधारेंनी शिंदे गटाला झापलं !

2023-11-13 18:59:47

Diwali Pahat : गौतमी पाटीलनं गाजवली ठाणेकरांची दिवाळी... जितेंद्र आव्हाड आणि सुषमा अंधारेंनी शिंदे गटाला झापलं !

Diwali 2023 : शेवाळेवाडीत रंगला दिवाळी पहाट संगीत महोत्सव; नागरिकांचा भरघोस प्रतिसाद

2023-11-12 17:12:55

Diwali 2023 : शेवाळेवाडीत रंगला दिवाळी पहाट संगीत महोत्सव; नागरिकांचा भरघोस प्रतिसाद

पुणे : उद्यानांत यंदा दिवाळी पहाट नाहीच?

2021-10-27 09:53:45

पुणे : उद्यानांत यंदा दिवाळी पहाट नाहीच?

पुणे : दिवाळी पहाटचे कार्यक्रमही 'अनलॉक'

2021-10-23 09:19:27

पुणे : दिवाळी पहाटचे कार्यक्रमही 'अनलॉक'

यंदा दिवाळी पहाट 'सुनीसुनी'

2020-11-11 15:00:05

यंदा दिवाळी पहाट 'सुनीसुनी'