DahisarVidhansabha Constituency | विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना – ठाकरे गटाकडून काल वर्सोवा, घाटकोपर पश्चिम, मलबार हिल आणि दहिसर विधानसभेसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले. दहिसर विधानसभा मतदारसंघातून तेजस्वी घोसाळकर आणि विनोद घोसाळकर दोघेही इच्छूक होते. त्यामुळे सासरे आणि सूनेमध्ये उमेदवारी कोणाला मिळणार असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला होता. त्यानुसार पहिल्यांदा तेजस्वी घोसाळकर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. परंतु काही वेळातच विनोद घोसाळकर यांचे नाव समोर आले. विनोद घोसाळकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा सुरुवातीला शिवसेना ठाकरे गटाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून आठ वाजून पाच मिनिटांनी तेजस्वी घोसाळकर यांचं नाव जाहीर करण्यात आले. परंतु, तासाभरातच 8 वाजून 58 मिनिटांनी हे नाव बदलण्यात आलं आणि त्याजागी विनोद घोसाळकर यांचं नाव एडीट करण्यात आलं. त्यामुळे आत दहिसर विधानसभा मतदारसंघासाठी विनोद घोसाळकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली आहे. DahisarVidhansabha Constituency | शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची 8 फेब्रुवारी रोजी फेसबूक लाईव्ह करून हत्या करण्यात आली होती. या हत्येत मॉरिस नोरान्हा उर्फ मॉरिसभाईने यांचं नाव समोर आलं होतं. भाजपाकडून मनीषा चौधरी यांना उमेदवारी दरम्यान, अभिषेक घोसाळकर यांचे वडील विनोद घोसाळकर हे उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक आहे. विनोद घोसाळकर हे २००९ साली या मतदारसंघाचे आमदार होते. त्यानंतर २०१४ पासून महायुतीच्या काळात भाजपाच्या मनीषा चौधरी या ठिकाणी निवडून आल्या. परंतु, विनोद घोसाळकर यांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. तर भाजपाने या मतदारसंघातून मनीषा चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. हेही वाचा: सणासुदीच्या काळात वांद्रे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी ; 9 प्रवासी जखमी, दोघांची प्रकृती गंभीर