dagdusheth ganpati : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्राणप्रतिष्ठा; पाहा खास फोटो…

पुणे – आज देशभरात गणपतीचा (ganpati) मोठा जल्लोष पाहायला मिळत आहे. घरोघरी बाप्पाचे आगमन होण्यास सुरूवात झाली असून सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पुणे (pune) आणि मुंबईत (mumbai) खास करून गणपतीचा मोठा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो. यावर्षी देखील पुण्यनगरी गणपतीच्या स्वागतासाठी सजली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीसांचा देखील कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. अश्यातच लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची (dagdusheth ganpati) प्राणप्रतिष्ठा झाली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी ८.३० वाजता मुख्य मंदिरापासून मिरवणुकीला श्री हनुमानाच्या ४ मूर्ती असलेल्या फुलांच्या रथातून सुरुवात झाली.
यंदा पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई (dagdusheth ganpati) सार्वजनिक गणपतीसाठी अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. या मंदिराचे हे खास आकर्षण असणार आहे.





