”त्याने माझ्यासोबत खूप वाईट केलं, बाबा तुम्ही माझ्या मृत्यूच्या बदला त्याच्याकडून अवश्य घ्या’’, सुसाईड नोट लिहून मुलीची आत्महत्या

लखनौ – एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना उत्तर प्रदेशमधील जौनपूरमध्ये घडली आहे. मृत्यूपुर्वी या मुलीने सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. त्यामध्ये मृत्यूचा बदला घेण्याची इच्छा तिने आपल्या पित्याला व्यक्त केली आहे.
रुस्तम असे मुख्य आरोपीचे नाव असून तो पसार झाला आहे. मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली असून सुरेरी पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
जौनपूर जिल्ह्यातील एका १५ वर्षीय मुलीस काही तरुण गेल्या काहीदिवसांपासून नाहक त्रास येत होते. त्यामुळे ही मुलगी त्रासली होती. त्यातूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.
ही मुलगी रात्री झोपण्यासाठी खोलीत गेली असता सकाळी उशीर झाला तरी खोलीतून बाहेर आली नाही. तेव्हा आईने दरवाजा उघडला असता तिला पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. कुटुंबीयांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोट मिळाली. त्यामध्ये माझ्या मृत्यूला रुस्तम जबाबदार आहे. त्याने माझ्यासोबत खूप वाईट काम केले आहे. बाबा तुम्ही माझ्या मृत्यूच्या बदला त्याच्याकडून अवश्य घ्या’’ असी विनंती केली आहे.





