दादाराव केचे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज मागे; वर्ध्यात बंडखोरी रोखण्यास भाजपला यश

Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी वर्धा येथील आर्वी मतदारसंघातील बंडखोर आमदार दादाराव केचे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केलेला अर्ज मागे घेतला आहे. केचे यांची अहमदाबाद येथे केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांच्याशी भेट झाल्यानंतर सकारात्मक चर्चा होऊन उमेदवारी मागे घेत असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले.
दादाराव केचे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचे स्वीय सहाय्यक आहेत. दादाराव केचे यांनी सुमित वानखेडे यांच्या विरोधात नामांकन दाखल केलं होतं. मात्र त्यांची नाराजी दूर करण्यास भाजपाला मोठे यश आले आहे.
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न सुरू
भाजपने सुमित वानखेडे यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपचे आमदार दादाराव केचे यांनी अपक्ष लढणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी अपक्ष अर्जही दाखल केला. मात्र त्यानंतर पक्षाकडून केचे यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न सुरू होते. अखेर जिल्हा भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अर्ज मागे घेत असल्याचं जाहीर केलं. Maharashtra Assembly Election 2024 |
दादाराव केचे हे वर्ध्यातील आर्वीचे आमदार आहेत. त्यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र अहमदाबादमध्ये अमित शहा यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी अर्ज मागे घेत असल्याचं सांगितलं. Maharashtra Assembly Election 2024 |
दरम्यान, आश्वासन देऊनही तिकीट मिळाले नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य आले आणि त्यांच्या आग्रहाने अपक्ष उमेदवारी दाखल केली. कार्यकर्ते कार्यकर्त्यांपासून दूर जाऊ नये आणि पक्षाकरिता उमेदवारी मागे घेत असल्याचे यावेळी केचे यांनी स्पष्ट केले.





