मोठी घोषणा ! राज्यात आगामी शैक्षणिक वर्षापासून लागू होणार ‘सीबीएसई पॅटर्न’ ; शैक्षणिक मंत्र्यांनी केले जाहीर

Dada Bhuse on ‘CBSE Pattern’ । राज्यतील केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडे (सीबीएसई) पालकांचा वाढत कल पाहून राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून सर्व सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये ‘सीबीएसई पॅटर्न’ राबवण्यात येणार आहे. इयत्ता पहिलीला शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये ‘सीबीएसई पॅटर्न’ सुरू करण्यात येणार आहे. तर, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये दोन टप्प्यात हा पॅटर्न राज्यात राबविला जाणार आहे. याविषयीची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.
इयत्ता पहिलीला ‘सीबीएसई पॅटर्न’ लागू होईल Dada Bhuse on ‘CBSE Pattern’ ।
शालेय शिक्षण विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी दादा भुसे हे पुणे दौऱ्यावर होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भातील मोठी घोषणा केली. याविषयी बोलताना दादा भुसे यांनी,‘‘विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी पावले उचलली जात आहेत. त्यात राज्यातील शाळांमध्ये ‘सीबीएसई पॅटर्न’ देखील राबवण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच येत्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता पहिलीला ‘सीबीएसई पॅटर्न’ लागू होईल, असे देखील त्यांनी यावेळी जाहीर केले. तसेच शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये अन्य इयत्तांचा ‘सीबीएसई पॅटर्न लागू होईल, त्यानुसार नवीन अभ्यासक्रम तयार करणे, त्यावर आधारित पाठ्यपुस्तके बालभारतीमार्फत छापणे अशी कार्यवाही होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
‘त्या’ शाळा बंद होणार नाहीत Dada Bhuse on ‘CBSE Pattern’ ।
पुढे बोलताना दादा भुसे यांनी,”या वर्षभरात शिक्षकांना नवीन अभ्यासक्रमाची माहिती देऊन त्यांना प्रशिक्षण दिले जाईल. राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याऐवजी तेथील विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील. परंतु, काही शाळांमध्ये पटसंख्या शून्य आहे, अशा ठिकाणी मात्र शाळांचा विचार करायला हवा,” असेही ते म्हणाले.





