न्या. डी.वाय. चंद्रचूड देशाचे 50 वे सरन्यायाधीश

नवी दिल्ली – देशाच्या सरन्यायाधीशपदी न्या.डी.वाय. चंद्रचूड यांची देशाचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यास राष्ट्रपदी द्रौपदी मुर्मू यांनी आज मंजूरी दिली. केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू यांनी ही माहिती दिली.
न्या. चंद्रचूड यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 9 नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीशपदाची शपथ देतील. विद्यमान सरन्यायाधीश उदय लळीत यांच्यानंतर न्या. चंद्रचूड हे देशाचे सरन्यायाधीश होतील.
In exercise of the power conferred by the Constitution of India, President appoints Dr. Justice DY Chandrachud, Judge, Supreme Court as the Chief Justice of India with effect from 9th November 2022, tweets Union Law Minister Kiren Rijiju
(File photo of Dr Justice DY Chandrachud) pic.twitter.com/fYNnzcK0X0
— ANI (@ANI) October 17, 2022
न्या. चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयातील सध्याचे सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश आहेत. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विविध पिठांवर न्यायदानाचे काम केले आहे. त्यांनी दिलेल्या गाजलेल्या निकालांमध्ये अयोध्या-रामजन्मभूमी वादाचे प्रकरण आणि गोपनीयतेचा अधिकार आणि व्यभिचाराशी संबंधित प्रकरणाचा समावेश आहे.
न्या. चंद्रचूड यांना 13 मे 2016 रोजी बढती देउन सर्वोच्च न्यायालयात नियुक्त करण्यात आले होते. गेल्याच आठवड्यात आपले उत्तराधिकारी म्हणून न्या. लळीत यांनी न्या. चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केली होती.




