पुणे | सायबर सिक्युरिटी; करिअरचा नवा पर्याय

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सायबर सिक्युरिटी, सायबर फॉरेन्सिक्स आणि सायबर क्राइम इन्व्हेस्टिगेशन या विषयांतील व्यावसायिक प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. पुणे विद्यापीठ आणि ट्रान्सेंडेंटल टेक्नॉलॉजीज यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतींनी हा कोर्स करता येईल. सायबर सिक्युरिटी, कायदा अंमलबजावणी आणि नॅशनल सिक्युरिटी क्षेत्रातील ४० हून अधिक राष्ट्रीय तज्ज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत, असे प्र- कुलगुरू प्रा.डॉ.पराग काळकर यांनी सांगितले.
अभ्सासक्रमाची उद्दिष्ट्ये
विद्यार्थी, व्यावसायिक आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहिती प्रणाली रक्षण करण्याची आणि सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी आवश्यक कौशल्ये असावीत.
अभ्यासक्रम, क्रेडिट आणि कालावधी
सायबर सिक्युरिटी स्पेशॅलिस्ट – १८ -दोन महिने
मास्टरिंग इन्फॉर्मेशन सिक्युरिटी – २० – सहा महिने
सायबर क्राइम इन्वेस्टिगेटर – २८ – सहा महिने
या प्रमुख विषयांचा समावेश
आक्षेपार्ह आणि बचावात्मक सुरक्षा, एसओसी आणि एसआयईएम, सायबर इंटेलिजन्स आणि इन्व्हेस्टिगेशन, डार्क वेब, सायबर फॉरेन्सिक्स आणि क्लाउड सुरक्षा, नेटवर्क सुरक्षा आणि क्रिप्टोग्राफी विषयांचा अभ्यासक्रमात समावेश आहे.
परिपूर्ण अभ्यासक्रम
विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानासह, सायबर सुरक्षा धोके आणि हल्ले वेगाने वाढत आहेत. कॉर्पोरेट, संस्था आणि सरकारांसाठी ही एक मोठी चिंतेची बाब आहे. तंत्रज्ञान विभागाद्वारे ऑफर केलेले सायबर सुरक्षा अभ्यासक्रम हे सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी परिपूर्ण अभ्यासक्रम आहेत, असे प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. विजय खरे यांनी सांगितले आहे.
सायबर सुरक्षा अभ्यासक्रम हा अशा प्रकारचा अनोखा आणि पहिला उपक्रम आहे. उद्योग विशेषज्ञ आणि सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात कार्यरत व्यावसायिकांद्वारे शिकविला जाणारा सखोल व्यावहारिक दृष्टीकोन आणि ज्ञान प्रदान करणारा उपक्रम आहे. – प्रा. डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ





