सायबर हल्ल्यात 200 टक्क्यांनी वाढ
Updated On:

मुंबई :- गेल्या दोन महिन्यांत भारतावरील सायबर हल्ल्यात 200 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, याचा संबंध भारत-चीन सरहद्दीवरील तणावाशी असल्याचा पुरावा उपलब्ध नाही.
माजी मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी भूषण राय यांनी सांगितले की, जानेवारीपासूनच भारतावरील सायबर हल्ल्यात वाढ होऊ लागली होती. नंतर लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर बरेच कर्मचारी घरातून काम करू लागले. याचा गैरफायदा सायबर हल्लेखोर घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे सरकारबरोबरच कंपन्यांनी सायबर सुरक्षेकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.





