\n

अत्यंत रोमहर्षक व अटीतटीच्या झालेल्या लढतीत दक्षिण आफ्रिकेने एकदिवसीय सामन्यांच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानवर केवळ 1 गडी राखून विजय मिळवला. एकवेळ दक्षिण आफ्रिका अत्यंत सहज विजय मिळवेल अशी सामन्याची स्थिती असताना एकेक गडी बाद होत गेले व सामना रंगतदार स्थितीत आला होता. मात्र, केशव महाराज व तबरेझ शम्सी यांनी अत्यंत शांतपणे फलंदाजी केली व संघाचा विजय साकार केला. हा दक्षिण आफ्रिकेचा यंदाच्या स्पर्धेतील सहावा विजय ठरला.

\n

पाकिस्तानने विजयासाठी दिलेल्या 271 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात अडखळत झाली. भरात असलेला सलीमीवीर क्वांटन डीकॉकने कर्णधार टेम्बा बवुमाच्या साथीत 34 धावांची सलामी दिली. डीकॉकने अवघ्या 14 चेंडूत 5 चौकारांसह 24 धावा केल्या. मात्र, अततायी फटका मारण्याच्या प्रयत्नात तो परतला. बवुमानेही आक्रमक फलंदाजी करतान रासी वॅन डर दुसेनसह संघाचे अर्धशतक फलकावर लावले. बवुमाही अनावश्‍यक फटका मारताना बाद झाला. त्याने 27 चेंडूत 4 चौकार व 1 षटकारासह 28 केल्या.

\n

यावेळी यंदाच्या स्पर्धेत तुफानी फलंदाजी करत असलेला एडन मार्करमने दुसेनसह संघाचे शतक फलकावर लावले. स्थिरावलेला दुसेन पंचांच्या निर्णयाचा बळी ठरला. त्याला उसामा मीरने पायचित बाद केले. दुसनने 21 धावांची खेळी केली. एका बाजूने मार्करम भक्‍कमपणे फलंदाजी करत होता. मात्र, त्याचवेळी हेनरीच क्‍लासेनही बाद झाला व दक्षिण आफ्रिकेचा डाव संकटात सापडला.

\n

मार्करमने आपले अर्धशतक पूर्ण करताना डेव्हीड मिलरच्या साथीत पुन्हा एकदा डाव सावरला. या जोडीने अर्धशतकीभागीदारी करत संघाला द्विशतकी मजल मारून दिली. मात्र, त्याचवेळी मिलरला शाहीन आफ्रीदीने अफलातून चेंडूवर बाद केले व ही जोडी फोडली. मिलरने 33 चेंडूत 2 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 29 धावा केल्या. त्यानंमतर मार्को जेन्सनने मार्करमला साथ देत धावसंख्या वाढवली. मात्र, षटकार फटकावल्यावर चौकार मारण्याच्या प्रयत्नात तो 14 चेंडूत 2 चौकार व 1 षटकारासह 20 धावांवर बाद झाला. यावेळी शतकाच्या जवळ आलेला मार्करम 91 धावांवर बाद झाला व सामना रंगतदार स्थितीत आला. मार्करमने 93 चेंडूत 7 चौकार व 3 षटकारांची आतषबाजी केली. आता खेळपट्टीवर केशव महाराज कोएत्झीला साथ देण्यासाठी आला. त्यावेळी त्यांना विजयासाठी 21 धावांची गरज होती.

\n

शाहीन आफ्रीदीने कोएत्झीला बाद करत दक्षिण आफ्रिकेची स्थिती 8 बाद 250 अशी केली. यावेळी हॅरीस रौफने लुंगी एन्जीडीला बाद केले. त्यानंतर केशव महाराज व तबरेझ शम्सी यांनी कोणतेही दडपण न घेता एकेरी धावा करत संघाला विजयासमीप आणले. महाराजने चौकार फटकावला व संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. महाराज 7 तर शम्सी 4 धावांवर नाबाद राहीले. पाकिस्तानकडून शाहीन शाह आफ्रीदीने 3 बळी घेतले. उसामा मीर, महंमद वासीम ज्युनिअर व हॅरीस रौफ यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

\n
\n

A nervy finish in Chennai as South Africa win by one wicket 🏏

\n

Great fight shown by the boys.#PAKvSA | #DattKePakistani pic.twitter.com/sb0FVDRzgh

\n

— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 27, 2023

\n

\n

तत्पूर्वी, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पाकिस्तान संघ पुन्हा एकदा पूर्ण 50 षटकेही खेळू शकला नाही. दक्षिण आफ्रिकेने त्यांना 46.4 षटकांत 270 धावांत गुंडाळले. पाकिस्तानकडून सौद शकीलने सर्वाधिक 52 आणि कर्णधार बाबर आझमने 50 धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त शादाब खानने 43 आणि मोहम्मद रिझवानने 41 धावांचे योगदान दिले. तर मोहम्मद नवाजने 24, इफ्तिखार अहमदने 21 आणि इमाम उल हकने 12 धावा केल्या. अब्दुल्ला शफीक नऊ धावा करून, मोहम्मद वसीम ज्युनियर सात धावा करून आणि शाहीन आफ्रिदी दोन धावा करून बाद झाले. हरिस रौफ खाते न उघडता नाबाद राहिला.

\n

चेन्नईच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेकडून फिरकीपटू तबरेझ शम्सीने सर्वाधिक 4 बळी घेतले. यादरम्यान त्याने 10 षटकात 6 च्या इकॉनॉमीसह 60 धावा खर्च केल्या. याशिवाय मार्को यानसेनने 3 पाकिस्तानी फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. कोएत्झीला 2 आणि लुंगी अँडिगीला 1 यश मिळाले.

\n

संक्षिप्त धावफलक –

\n

पाकिस्तान – 46.4 षटकांत सर्वबाद 270 धावा. (सौद शकिल 52, बाबर आझम 50, शादाब खान 43, महंमद रिझवान 31, इफ्तेखार अहमद 21, महंमद नवाज 24, तबरेझ शम्सी 4-60, मार्को जेन्सन 3-43, जेराल्ड कोएत्झी 2-42).

\n

दक्षिण आफ्रिका – 47.2 षटकांत 9 बाद 271 धावा. (एडन मार्करम 91, डेव्हीड मिलर 29, टेम्बा बवुमा 28, क्वांटन डीकॉक 24, रासी वॅन डर दुसेन 21, मार्को जेन्सन 20, केशव महाराज नाबाद 7, तबरेझ शम्सी नाबाद 4, शाहीन शाह आफ्रीदी 3-45, उसामा मीर 2-45, महंमद वासीम ज्युनिअर 2-50, हॅरीस रौफ 2-62).

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"#CWC23 #PAKvSA : पाकचा सलग चौथा पराभव, अतितटीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा एका विकेटने थरारक विजय…","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/10/pka.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/cwc23-pakvsa-pakistans-fourth-consecutive-defeat-in-odi-world-cup-2023-south-africa-beats-pakistan-by-one-wicket#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/10/pka.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/cwc23-pakvsa-pakistans-fourth-consecutive-defeat-in-odi-world-cup-2023-south-africa-beats-pakistan-by-one-wicket#webpage","name":"#CWC23 #PAKvSA : पाकचा सलग चौथा पराभव, अतितटीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा एका विकेटने थरारक विजय…","url":"https://www.dainikprabhat.com/cwc23-pakvsa-pakistans-fourth-consecutive-defeat-in-odi-world-cup-2023-south-africa-beats-pakistan-by-one-wicket","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/cwc23-pakvsa-pakistans-fourth-consecutive-defeat-in-odi-world-cup-2023-south-africa-beats-pakistan-by-one-wicket#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/10/pka.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/cwc23-pakvsa-pakistans-fourth-consecutive-defeat-in-odi-world-cup-2023-south-africa-beats-pakistan-by-one-wicket#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/cwc23-pakvsa-pakistans-fourth-consecutive-defeat-in-odi-world-cup-2023-south-africa-beats-pakistan-by-one-wicket","name":"#CWC23 #PAKvSA : पाकचा सलग चौथा पराभव, अतितटीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा एका विकेटने थरारक विजय…"}}]}}}

#CWC23 #PAKvSA : पाकचा सलग चौथा पराभव, अतितटीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा एका विकेटने थरारक विजय…