#CWC23 INDvPAK : टीम इंडिया 18 वर्षांनंतर अहमदाबादमध्ये पाकविरुद्ध खेळणार एकदिवसीय सामना…

Updated On:

World Cup 2023 #INDvPAK Match Updates : विश्वचषकाचा 12वा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर शनिवारी (14 ऑक्टोबर) हा सामना खेळवला जाणार आहे. भारतीय संघ 18 वर्षांनंतर अहमदाबादमध्ये पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय सामना खेळणार आहे. शेवटच्या वेळी 2005 मध्ये दोन्ही संघ येथे आमनेसामने आले होते, तेव्हा पाकिस्तानने तीन विकेट्सने विजय मिळवला होता. भारतीय संघालाही त्या पराभवाचा बदला घ्यायला आवडेल.

अहमदाबादमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत तीन सामने झाले आहेत. दोन्ही संघ येथे एकमेकांविरुद्ध एक कसोटी, एक वनडे आणि एक टी-20 सामने खेळले आहेत. 1987 मध्ये कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. 2005 मध्ये भारतीय संघ एकदिवसीय सामन्यात हरला होता आणि 2012 मध्ये भारताने T20 मध्ये 11 धावांनी विजय मिळवला होता.

विश्वचषकात भारत पाकविरोधात अपराजित

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं पाकिस्तानविरुद्ध एकही सामना गमावलेला नाही. टीम इंडियाने 1992, 1996, 1999, 2003, 2011, 2015 आणि 2019 मध्ये पाकिस्तानचा पराभव केला आहे. भारतीय संघाला ही विजयी मालिका सुरू ठेवायची आहे. टीम इंडिया तिसर्‍यांदा विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध त्याच्या घरच्या मैदानावर खेळणार आहे. भारताने 1996 (बंगलोर) आणि 2011 (मोहाली) मध्ये विजय मिळवला होता.

दोन्ही संघ जबरदस्त फॉर्मात… 

सध्याच्या एकदिवसीय विश्वचषकात दोन्ही संघांचा फॉर्म चांगला आहे. भारताने ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळवला आहे. त्याचवेळी पाकिस्तानने नेदरलँड आणि श्रीलंकेचा पराभव केला आहे. आता रोहित शर्मा आणि बाबर आझम यांच्या नजरा विजयाची हॅट्ट्रिक करण्यावर असतील.

आणखी संबंधित बातम्या

Bhuvneshwar Kumar Comeback : "भुवनेश्वरच्या कमबॅकने बाकीच्या खेळाडूंना प्रेरणा मिळेल...", भारताच्या माजी खेळाडूच वक्तव्य

2026-10-07 22:40:09

Bhuvneshwar Kumar Comeback : "भुवनेश्वरच्या कमबॅकने बाकीच्या खेळाडूंना प्रेरणा मिळेल...", भारताच्या माजी खेळाडूच वक्तव्य

Ishan Kishan Record : छोटा पॅकेट मोठा धमाका..! इशान किशनने मोडला किंग कोहलीचा १० वर्षांचा जुना विक्रम

2026-10-07 19:31:33

Ishan Kishan Record : छोटा पॅकेट मोठा धमाका..! इशान किशनने मोडला किंग कोहलीचा १० वर्षांचा जुना विक्रम

Tanmay Balouda Record : भारताच्या १८ वर्षीय फिरकीपटूचा ऐतिहासिक पराक्रम! टिम साऊदीचा १९ वर्षांचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास

2026-10-07 18:53:23

Tanmay Balouda Record : भारताच्या १८ वर्षीय फिरकीपटूचा ऐतिहासिक पराक्रम! टिम साऊदीचा १९ वर्षांचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास

Cricketers GPS Device : भारतीय क्रिकेटपटूच्या पाठीवर दिसणारं 'हे' काळ्या रंगाच उपकरण नक्की काय असतं अन् सामन्यात का वापरतात?

2026-10-07 16:59:59

Cricketers GPS Device : भारतीय क्रिकेटपटूच्या पाठीवर दिसणारं 'हे' काळ्या रंगाच उपकरण नक्की काय असतं अन् सामन्यात का वापरतात?

Shreyas Iyer Century : लखनौमध्ये कर्णधार श्रेयस अय्यरचे विक्रमी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ८ विकेट्सने दणदणीत विजय

2026-10-06 22:34:24

Shreyas Iyer Century : लखनौमध्ये कर्णधार श्रेयस अय्यरचे विक्रमी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ८ विकेट्सने दणदणीत विजय