#CWC23 #INDvPAK : रोहितच्या नावावर आणखी विक्रम, वनडेत अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय…

World Cup 2023 #INDvPAK Match Result : विश्वचषकाच्या 12व्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. भारताने या स्पर्धेत सलग तिसरा विजय मिळवला आहे. याआधी भारतानं ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचा पराभव केला. भारताचे आता तीन सामन्यांत सहा गुण झाले आहेत. विशेष म्हणजे वर्ल्ड कपमध्ये भारताचा पाकिस्तानवर सलग आठवा विजय आहे. टीम इंडियाचा पुढचा सामना 19 ऑक्टोबरला पुण्यात बांगलादेशशी होणार आहे. त्याचबरोबर पाकिस्तानचा संघ 20 तारखेला बंगळुरूमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचा संघ 42.5 षटकांत 191 धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात भारताने 30.3 षटकांत 3 गडी गमावत 192 धावा करून सामना जिंकला. रोहितने 63 चेंडूत 86 धावा करत भारतीय संघाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिले. त्याने आपल्या खेळीत सहा चौकार आणि सहा षटकार मारले. यासह त्याने आणखी एका विक्रमाची नोंद केली आहे.
रोहित शर्माने केली विशेष कामगिरी…
रोहित शर्माचे पाकिस्तान विरूध्दच्या सामन्यानंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण 303 षटकार झाले आहेत. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात सुरूवातीचे 3 षटकार ठोकत रोहित शर्मा याने एकदिवसीय (वनडे) क्रिकेटमध्ये 300 षटकार ठोकण्याचा विक्रम नोंदवला आहे. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित तिसरा तर भारताकडून अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू ठरला आहे.
🚨 Milestone Alert 🚨
3⃣0⃣0⃣ ODI Sixes & Going Strong 💪 💪
Rohit Sharma 🤝 Another Landmark
Follow the match ▶️ https://t.co/H8cOEm3quc#CWC23 | #TeamIndia | #INDvPAK | #MeninBlue pic.twitter.com/fjrq0AQFyF
— BCCI (@BCCI) October 14, 2023
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत शाहीद आफ्रिदी अव्वल स्थानी आहे. त्याने 351 षटकार मारले आहेत. तर ख्रिस गेल 331 षटकारांसह दुसऱ्या स्थानी, तर रोहित शर्मा 300 षटकारांसह तिसऱ्या स्थानी आहे. तर भारताकडून अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. रोहित शर्मा याने 254 सामन्यात ही कामगिरी केली आहे. भारताकडून या यादीत 229 षटकारांसह महेंद्रसिंह धोनी दुसऱ्या स्थानी आहे. तर 195 षटकारांसह सचिन तेंडुलकर तिसऱ्या स्थानी आहे.





