\n

तत्पूर्वी, न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 49.2 षटकात 388 धावांवर संपला. एकदिवसीय आणि एकदिवसीय विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाने कॅनबेरा येथे किवीजविरुद्ध पाच गडी गमावून 378 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाची विश्वचषकातील ही तिसरी सर्वोत्तम धावसंख्या आहे.

\n

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली होती. ट्रॅव्हिस हेडने विश्वचषकातील पहिला सामना खेळताना अवघ्या 59 चेंडूत शतक झळकावले. त्याचे वनडे कारकिर्दीतील हे चौथे शतक होते. ट्रॅव्हिस हेडला दुखापत झाली होती आणि त्यामुळे तो सुरुवातीचे काही सामने खेळू शकला नाही. त्याने वॉर्नरसोबत पहिल्या विकेटसाठी 117 चेंडूत 175 धावांची भागीदारी केली होती. 59 चेंडूतील शतक हे या विश्वचषकातील तिसरे जलद शतक आहे. ग्लेन मॅक्सवेलने 40 चेंडूत शतक तर एडन मार्करामने 49 चेंडूत शतक झळकावले. हेडने 67 चेंडूत 10 चौकार आणि सात षटकारांच्या मदतीने 109 धावांची खेळी केली.

\n

त्याच वेळी, वॉर्नरने सलग तिसऱ्या सामन्यात 50+ धावा केल्या. यापूर्वी त्याने पाकिस्तान आणि नेदरलँडविरुद्ध शतके झळकावली होती. वॉर्नर 65 चेंडूंत पाच चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने 81 धावा करून बाद झाला. यानंतर स्टीव्ह स्मिथही 18 धावा करून माघारी परतला . ग्लेन फिलिप्सने तिन्ही विकेट घेतल्या. मिचेल मार्श 36 धावा करून बाद झाला तर मार्नस लॅबुशेन 18 धावा करून बाद झाला.

\n

पुन्हा षटकार-चौकारांचा पाऊस..

\n

ऑस्ट्रेलियाच्या डावात 20 षटकार आणि 32 चौकार मारले गेले. म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या डावात षटकाराच्या साह्यानं 120 आणि चौकारांवर 128 अशा मिळून एकूण 248 धावा आल्या.

\n

त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने 24 चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 41 धावांची तुफानी खेळी केली. त्याचवेळी जोश इंग्लिशने 28 चेंडूंत चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 38 धावा केल्या. कर्णधार पॅट कमिन्सने 14 चेंडूंत दोन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 37 धावा केल्या. 49 व्या षटकात ट्रेंट बोल्टने एकाच षटकात तीन बळी घेतले. इंग्लिश आणि कमिन्सशिवाय त्याने झाम्पाला बाद केले. त्यानंतर 50 व्या षटकात मॅट हेन्रीने मिचेल स्टार्कला नीशमकडे झेलबाद केले आणि ऑस्ट्रेलियाचा डाव 388 धावांवर संपवला.  न्यूझीलंडकडून गोलंदाजीत बोल्ट आणि फिलिप्सने प्रत्येकी तीन, मिचेल सँटनरने दोन विकेट घेतल्या. हेन्री आणि नीशम यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

\n

 

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"#CWC23 #AUSvNZ : रचिनचे शतक व्यर्थ; अतितटीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची न्यूझीलंडवर मात…","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/10/aus-vs-nz-match.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/cwc23-ausvnz-australia-beats-new-zealand-by-five-runs-in-a-thrilling-match-rachins-century-in-vain#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/10/aus-vs-nz-match.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/cwc23-ausvnz-australia-beats-new-zealand-by-five-runs-in-a-thrilling-match-rachins-century-in-vain#webpage","name":"#CWC23 #AUSvNZ : रचिनचे शतक व्यर्थ; अतितटीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची न्यूझीलंडवर मात…","url":"https://www.dainikprabhat.com/cwc23-ausvnz-australia-beats-new-zealand-by-five-runs-in-a-thrilling-match-rachins-century-in-vain","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/cwc23-ausvnz-australia-beats-new-zealand-by-five-runs-in-a-thrilling-match-rachins-century-in-vain#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/10/aus-vs-nz-match.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/cwc23-ausvnz-australia-beats-new-zealand-by-five-runs-in-a-thrilling-match-rachins-century-in-vain#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/cwc23-ausvnz-australia-beats-new-zealand-by-five-runs-in-a-thrilling-match-rachins-century-in-vain","name":"#CWC23 #AUSvNZ : रचिनचे शतक व्यर्थ; अतितटीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची न्यूझीलंडवर मात…"}}]}}}

#CWC23 #AUSvNZ : रचिनचे शतक व्यर्थ; अतितटीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची न्यूझीलंडवर मात…