#CWC2023 #PAKvAFG : आझम-शफीकचे अर्धशतक; पाकचं अफगाणिस्तानसमोर 283 धावांचे लक्ष्य…

World Cup 2023 Pakistan vs Afghanistan Match Score Updates : विश्वचषकाच्या 22व्या सामन्यात पाकिस्तानसमोर अफगाणिस्तानचे आव्हान आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. गेल्या दोन सामन्यांत पाकिस्तान संघाचा पराभव झाला आहे. भारतानंतर ऑस्ट्रेलियानेही त्याचा पराभव केला आहे. दुसरीकडे, अफगाणिस्तानला गेल्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला आहे. मात्र, इंग्लंडचा पराभव करत अफगाणिस्तान संघानं स्पर्धेत मोठा उलटफेर केला आहे. अशा स्थितीत पाकिस्तानने त्यांंना कमी लेखणे चूकीचे ठरेल.
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कर्णधार बाबर आझम आणि अब्दुल्ला शफीक यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तान संघानं निर्धारित 50 षटकांत सात विकेट गमावत 282 धावा केल्या असून अफगाणिस्तानसमोर विजयासाठी 283 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे. पाकिस्तानकडून बाबर आझम आणि अब्दुल्ला शफीक यांनी अर्धशतके झळकावली. बाबरने 92 चेंडूत 4 चौकार अन् 1 षटकारासह सर्वाधिक 74 धावा केल्या तर अब्दुल्ला शफीकने 75 चेंडूत 4 चौकार अन् 2 षटकारासह 58 धावांची खेळी केली.
अखेरच्या षटकांमध्ये शादाब खान आणि इफ्तिखार अहमद यांनी शानदार फलंदाजी करत संघाची धावसंख्या 282 पर्यंत नेली. दोघांनी 40-40 धावांचे योगदान दिले. सौद शकीलने 25 आणि इमाम उल हकने 17 धावा केल्या. मोहम्मद रिझवानला केवळ आठ धावा करता आल्या. शाहीन आफ्रिदी तीन धावा करून नाबाद राहिला.
Pakistan set #AfghanAtalan a 283-run target! 🎯@Noor_Ahmad_15 got three, Naveen Ul Haq took two whereas @MohammadNabi007 and @AzmatOmarzay picked up a wicket each as @TheRealPCB finished at 282/7 at the halfway stage. 👍
Over to our bowlers now…!#AFGvPAK | #WarzaMaidanGata pic.twitter.com/OieMhs37WF
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) October 23, 2023
अफगाणिस्तानकडून नूर अहमदने 10 षटकात 49 धावा देताना सर्वाधिक तीन आणि नवीन उल हकने 7 षटकात 52 धावा देत दोन गडी बाद केले. मोहम्मद नबी आणि अजमतुल्ला उमरझाई यांना प्रत्येकी एक यश मिळाले.





