#CWC2023 #INDvBAN : बांगलादेशला तिसरा धक्का; सिराजने मिराजला केले बाद

World Cup India vs Bangladesh Match Live Score :- आज एकदिवसीय विश्वचषक 2023 चा 17 वा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळला जात आहे. भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये असून आतापर्यंतचे तिन्ही सामने जिंकले आहेत. तर बांगलादेश संघाने तीनपैकी एक जिंकला आहे आणि दोन गमावले आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यातील हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे.
बांगलादेशला 25व्या षटकात 129 धावांवर तिसरा धक्का बसला. मोहम्मद सिराजने मेहदी हसन मिराजला यष्टिरक्षक केएल राहुलकडे झेलबाद केले. मिराजला केवळ 3 धावा काढता आल्या. 25 षटकांनंतर बांगलादेशची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 131 धावा आहे. सध्या तौहीद हृदय आणि लिटन दास क्रीजवर आहेत.
Bangladesh 3⃣ down! @mdsirajofficial picks his first wicket of the match, courtesy a brilliant catch from @klrahul 👌 👌
Follow the match ▶️ https://t.co/GpxgVtP2fb#CWC23 | #TeamIndia | #INDvBAN | #MeninBlue pic.twitter.com/YlVjnmG8V4
— BCCI (@BCCI) October 19, 2023
बांगलादेशला 20 व्या षटकात 110 धावांवर दुसरा धक्का बसला. रवींद्र जडेजाने कर्णधार नजमुल हुसेन शांतोला एलबीडब्ल्यू आऊट केले. त्याला 17 चेंडूत आठ धावा करता आल्या.
GONE! @imjadeja strikes as #TeamIndia scalp the second Bangladesh wicket 👍 👍
Follow the match ▶️ https://t.co/GpxgVtP2fb#CWC23 | #INDvBAN | #MeninBlue pic.twitter.com/FPCrCddn25
— BCCI (@BCCI) October 19, 2023
बांगलादेशला पहिला धक्का 15व्या षटकात 93 धावांवर बसला. कुलदीप यादवने तंजीद हसनला एलबीडब्ल्यू आऊट केले. त्याने 43 चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 51 धावा करून बाद झाला. 18 षटकांनंतर बांगलादेशची धावसंख्या एका विकेटवर 103 धावा आहे. सध्या कर्णधार नझमुल हसन शांतो 5*(13) आणि लिटन दास 44*(52) क्रीजवर आहेत.
L. B. W!@imkuldeep18 with a breakthrough for #TeamIndia! 👏 👏
Bangladesh lose Tanzid Hasan.
Follow the match ▶️ https://t.co/GpxgVtP2fb#CWC23 | #INDvBAN | #MeninBlue pic.twitter.com/wa8LsVMaNz
— BCCI (@BCCI) October 19, 2023
दरम्यान,एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात दोन्ही संघ 4 वेळा आमनेसामने आले आहेत, यामध्येही टीम इंडियाचे वर्चस्व राहिलेले आहे. भारताने 3 सामने जिंकले आहेत तर बांगलादेश संघाला केवळ एका सामन्यात भारताचा पराभव करण्यात यश आले आहे.
विश्वचषक 2007 : बांगलादेश 5 गडी राखून विजयी
विश्वचषक 2011 : भारत 87 धावांनी विजयी
विश्वचषक 2015 : भारत 109 धावांनी विजयी
विश्वचषक 2019 : भारत 28 धावांनी विजयी
एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात 35 वर्षांच्या एकदिवसीय क्रिकेट इतिहासात आतापर्यंत एकूण 40 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये टीम इंडियाने 31 एकदिवसीय सामने जिंकले आणि बांगलादेशने 8 सामने जिंकले, तर एका सामन्याचा निकाल लागला नाही.





