\n

ऑस्ट्रेलियन संघाने अप्रतिम गोलंदाजी करत नेदरलँड्सचा 21 षटकांत पराभव केला. त्यासाठी फिरकीपटू अॅडम झाम्पाने सर्वाधिक चार बळी घेतले. मिचेल मार्शला दोन विकेट मिळाल्या. मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

\n

तत्पूर्वी, दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत आठ गडी बाद 399 धावा केल्या.   कांगारू संघासाठी डेव्हिड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी विक्रमी शतके झळकावली. वॉर्नरने सहावे शतक झळकावून माजी कर्णधार रिकी पाँटिंगचा विक्रम मोडीत काढला.

\n
\n

🚨 History in Delhi 🚨

\n

Glenn Maxwell has obliterated the record for the fastest-ever Cricket World Cup century 😲 💥

\n

Read more about his stunning 💯 ⬇️#AUSvNED #CWC23https://t.co/YNMpKsuXhT

\n

— ICC (@ICC) October 25, 2023

\n

\n

विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक शतके झळकावणारा तो ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला. तर, मॅक्सवेलने शेवटच्या षटकांमध्ये झंझावाती खेळी खेळली आणि अवघ्या 40 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. विश्वचषकात सर्वात कमी चेंडूत शतक झळकावणारा तो खेळाडू ठरला. वॉर्नरने 93 चेंडूत 104 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 11 चौकार आणि तीन षटकार मारले तर मॅक्सवेलने 44 चेंडूत 106 धावा केल्या. यादरम्यान मॅक्सवेलने 9 चौकार आणि 8 षटकार ठोकले.

\n

मॅक्सवेलचे विक्रमी शतक..

\n

मॅक्सवेलने नेदरलँड्स विरूध्द शेवटच्या षटकांमध्ये तुफानी खेळी खेळली आणि अवघ्या 40 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. विश्वचषकात सर्वात कमी चेंडूत शतक झळकावणारा तो खेळाडू ठरला. मॅक्सवेलने या सामन्यात 44 चेंडूत 106 धावा केल्या. यादरम्यान मॅक्सवेलने 9 चौकार आणि 8 षटकार ठोकले. म्हणजेच मॅक्सवेलने केवळ चौकार आणि षटकारांसह 84 धावा केल्या. स्फोटक पद्धतीने खेळणाऱ्या कांगारू फलंदाजाने अवघ्या 27 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर मॅक्सवेलने खऱ्या अर्थाने आपली ताकद दाखवून दिली आणि पुढच्या 13 चेंडूत पुढचे अर्धशतक झळकावले. ग्लेन मॅक्सवेलने वर्ल्ड कपमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावण्याच्या बाबतीत अॅडम मार्करामला मागे टाकले आहे. मार्करामने या विश्वचषकात श्रीलंकेविरुद्ध खेळताना 49 चेंडूत शतक झळकावले होते. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर केविन ओब्रायनचे नाव आहे, ज्याने 50 चेंडूत ही कामगिरी केली. त्याचबरोबर मॅक्सवेलने 2015 च्या विश्वचषकात 51 चेंडूत शतक झळकावले होते.

\n

वॉर्नर आणि मॅक्सवेल व्यतिरिक्त स्टीव्ह स्मिथने 71 आणि मार्नस लॅबुशेनने 62 धावा केल्या. जोश इंग्लिशने 14 आणि कर्णधार पॅट कमिन्सने नाबाद 12 धावा केल्या. मिचेल मार्श नऊ धावा करून आणि कॅमेरून ग्रीन आठ धावा करून बाद झाले. मिचेल स्टार्क खातेही उघडू शकला नाही. एडन झाम्पाने एक धाव केली.

\n

नेदरलँड्सकडून गोलंदाजीत लोगान व्हॅन बीकने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. बास डी लीडेला दोन विकेट घेण्यात यश मिळालं. आर्यन दत्तने एक विकेट घेतली.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"#CWC2023 #AUSvNED : मॅक्सवेलचे विक्रमी शतक! ऑस्ट्रेलियाचा विश्वचषक इतिहासातील सर्वात मोठा विजय…","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/10/jj.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/cwc2023-ausvned-australia-recorded-the-biggest-win-in-world-cup-history-defeated-netherlands-by-309-runs#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/10/jj.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/cwc2023-ausvned-australia-recorded-the-biggest-win-in-world-cup-history-defeated-netherlands-by-309-runs#webpage","name":"#CWC2023 #AUSvNED : मॅक्सवेलचे विक्रमी शतक! ऑस्ट्रेलियाचा विश्वचषक इतिहासातील सर्वात मोठा विजय…","url":"https://www.dainikprabhat.com/cwc2023-ausvned-australia-recorded-the-biggest-win-in-world-cup-history-defeated-netherlands-by-309-runs","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/cwc2023-ausvned-australia-recorded-the-biggest-win-in-world-cup-history-defeated-netherlands-by-309-runs#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/10/jj.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/cwc2023-ausvned-australia-recorded-the-biggest-win-in-world-cup-history-defeated-netherlands-by-309-runs#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/cwc2023-ausvned-australia-recorded-the-biggest-win-in-world-cup-history-defeated-netherlands-by-309-runs","name":"#CWC2023 #AUSvNED : मॅक्सवेलचे विक्रमी शतक! ऑस्ट्रेलियाचा विश्वचषक इतिहासातील सर्वात मोठा विजय…"}}]}}}

#CWC2023 #AUSvNED : मॅक्सवेलचे विक्रमी शतक! ऑस्ट्रेलियाचा विश्वचषक इतिहासातील सर्वात मोठा विजय…