पुणे जिल्हा | वारुवाडीत औषधी झाडांची लागवड

नारायणगाव, (वार्ताहर) – जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बुधवारी (दि.5) वारुळवाडी येथील गणपीर डोंगरावर वड, पिंपळ, आवळा, लिंब, जांभळ, करंज, बहावा, कांचन, आवळा, बांबू , करवंद, अर्जुन, साताडा आदी आयुर्वेदीक झाडांची लागवड करण्यात आली आहे.
जुन्नर उपवनसंरक्षक अमोल सातपुते, वनपरिक्षेत्र आधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राबविण्यात आला. यावेळी नारायणगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ, प्राध्यापक मधुरा काळभोर,
विद्या गाडगेवनपाल, अनिता होले, वनरक्षक ज्ञानेश्वर पवार, वन कर्मचारी खंडू भुजबळ, आपदा मित्र सुशांत भुजबळ, ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य आदित्य डेरे, शंतनु डेरे, सुशील ढवळे यांच्या हस्ते झाडे लावण्यात आली.
गणपीर बाबा डोंगरावरील गणपीर बाबा देवस्थानाच्या परिसरात प्रत्येकी 25 औषधी झाडे लावण्यात आली असून झाडांना वारूळवाडी ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रत्येक ड्रीपच्या साह्याने पाणीपुरवठा करण्यात आला आहे. सामाजिक वनीकरण विभाग जुन्नर येडगाव नर्सरी यांनी जागतिक पर्यावरण दिन निमित्त निशुल्क झाडे दिली आहे.





