पुणे | सीटीईटीची परीक्षा १४ डिसेंबरला होणार

पुणे,{प्रभात वृत्तसेवा} – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सीटीईटी परीक्षेच्या तारखेत बदल केला असून, आता ही परीक्षा १५ डिसेंबरऐवजी १४ डिसेंबरला होणार आहे. त्याबाबतची सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावर अधिसूचनाही प्रसिद्ध केली आहे.
विविध उमेदवारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये १५ डिसेंबर रोजी स्पर्धा परीक्षा होणार आहेत.
त्यामुळे उमेदवारांचे हित लक्षात घेऊन सीटीईटीच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. एखाद्या शहरात उमेदवारांची संख्या जास्त असल्यास १५ डिसेंबर रोजीही सीटीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सीबीएसई द्वारे १४ डिसेंबर रोजी दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेतली जाईल. पेपर २ ची परीक्षा सकाळी ९.३० ते दुपारी १२ या वेळेत घेतली जाईल, तर पेपर १ ची परीक्षा दुसऱ्या शिफ्टमध्ये दुपारी २.३० ते ५ या वेळेत निश्चित करण्यात आली आहे. परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. १६ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे.





