\n

सनरायझर्स हैदराबादचा चेपॉकवर पहिला विजय –

\n

आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा ‘चेपॉकचा गड’ पूर्णपणे कोसळला आहे. आरसीबी आणि डीसीनंतर सनरायझर्स हैदराबादनेही या मैदानावर विजयाची चव चाखली. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादने यंदाच्या हंगामात तिसरा विजय मिळवला. चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात हर्षल पटेल आणि कामिंदू मेंडिस यांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सनरायझर्सने चेन्नईचा ५ गडी राखून पराभव केला.

\n
\n

A milestone victory 👏#SRH register their first ever win at Chepauk with a strong performance against #CSK 🔝💪

\n

Scorecard ▶ https://t.co/26D3UampFQ#TATAIPL | #CSKvSRH | @SunRisers pic.twitter.com/lqeX4CiWHP

\n

— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2025

\n

\n

हैदराबादने प्लेऑफच्या आशा ठेवल्या जिवंत –

\n

नवव्या आणि दहाव्या स्थानावर असलेल्या हैदराबाद आणि चेन्नईसाठी हंगामात त्यांच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी हा सामना खूप महत्त्वाचा होता. सनरायझर्सने यात यश मिळवले आणि चेन्नईला स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आणले. या हंगामात सनरायझर्सचा ९ सामन्यांतील हा तिसरा विजय आहे आणि संघ पॉइंट्स टेबलमध्ये ९व्या स्थानावरून ८व्या स्थानावर पोहोचला आहे. चेन्नईचा हा इतक्याच सामन्यांमधील सातवा पराभव आहे आणि संघ दहाव्या क्रमांकावर कायम आहे.

\n

हेही वाचा – CSK vs SRH : कामिंदू मेंडिसने हवेत डायव्हिंग करत ब्रेव्हिसचा घेतला अफलातून कॅच, VIDEO होतोय व्हायरल

\n

कामिंदू मेंडिसच्या अफलातून कॅचने सामन्याला दिली कलाटणी –

\n

हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि मोहम्मद शमीने पहिल्याच चेंडूवर विकेट घेत संघाला चांगली सुरुवात करून दिली. यानंतर युवा फलंदाज आयुष म्हात्रेने जोरदार आक्रमण केले पण तोही पॉवरप्लेमध्ये बाद झाला आणि चेन्नईने फक्त ४७ धावांत ३ विकेट्स गमावल्या. येथून, चेन्नईसाठी पदार्पण करणाऱ्या तरुण फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिसने संथ सुरुवातीनंतर आक्रमण केले आणि षटकारांचा पाऊस पाडला. पण कामिंदू मेंडिसने घेतलेल्या एका जबरदस्त झेलमुळे तो पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर, हर्षल पटेल आणि पॅट कमिन्स यांनी संघाला लवकर धावा करू दिल्या नाहीत आणि संघ १९.५ षटकांत १५४ धावांवर ऑलआउट झाला.

\n

हेही वाचा – CSK vs SRH : फलंदाजी करण्यापासून रोखताच संतापला जडेजा; मैदानातच आपटू लागला बॅट, पाहा VIDEO

\n

इशान-कामिंदूने विजयात बजावली महत्त्वाची भूमिका –

\n

सीएसकेच्या १५५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांनी दुसऱ्या चेंडूवर अभिषेक शर्माच्या रूपात पहिली विकेट गमावली, जो खाते न उघडताच बाद झाला. यानंतर, इशान किशन फलंदाजीला आला आणि त्याने ट्रॅव्हिस हेडला साथ देत धावसंख्या वाढवण्यास सुरुवात केली, ज्यामध्ये दुसऱ्या विकेटसाठी दोघांमध्ये ३७ धावांची भागीदारी दिसून आली. या सामन्यात १९ धावा केल्यानंतर हेड बाद झाला. या सामन्यात हेनरिक क्लासेनला बॅटने कोणतेही चमत्कार करता आले नाहीत आणि तो फक्त ७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर इशान किशन ४४ धावांवर बाद झाला. मात्र, कामिंदू मेंडिसने नाबाद ३२ धावांची खेळी साकारत संघाला विजय मिळवून माघारी परतला. सीएसकेसाठी नूर अहमदने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"CSK vs SRH : सनरायझर्स हैदराबादचा ऐतिहासिक विजय! पहिल्यांदाच भेदला सीएसकेचा ‘चेपॉक गड’","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/04/New-Project-19-4.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/vikasmudheeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/csk-vs-srh-sunrisers-hyderabad-register-historic-win-over-chennai-super-kings-by-5-wickets-at-chepauk-in-ipl-2025#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/04/New-Project-19-4.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/csk-vs-srh-sunrisers-hyderabad-register-historic-win-over-chennai-super-kings-by-5-wickets-at-chepauk-in-ipl-2025#webpage","name":"CSK vs SRH : सनरायझर्स हैदराबादचा ऐतिहासिक विजय! पहिल्यांदाच भेदला सीएसकेचा ‘चेपॉक गड’","url":"https://www.dainikprabhat.com/csk-vs-srh-sunrisers-hyderabad-register-historic-win-over-chennai-super-kings-by-5-wickets-at-chepauk-in-ipl-2025","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/csk-vs-srh-sunrisers-hyderabad-register-historic-win-over-chennai-super-kings-by-5-wickets-at-chepauk-in-ipl-2025#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/04/New-Project-19-4.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/csk-vs-srh-sunrisers-hyderabad-register-historic-win-over-chennai-super-kings-by-5-wickets-at-chepauk-in-ipl-2025#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/csk-vs-srh-sunrisers-hyderabad-register-historic-win-over-chennai-super-kings-by-5-wickets-at-chepauk-in-ipl-2025","name":"CSK vs SRH : सनरायझर्स हैदराबादचा ऐतिहासिक विजय! पहिल्यांदाच भेदला सीएसकेचा ‘चेपॉक गड’"}}]}}}

CSK vs SRH : सनरायझर्स हैदराबादचा ऐतिहासिक विजय! पहिल्यांदाच भेदला सीएसकेचा ‘चेपॉक गड’