Shreyas Iyer : सीएसकेविरुद्धच्या विजयानंतर श्रेयसला ‘ती’ चूक पडली महागात, बीसीसीआयने ठोठावला दंड

Shreyas Iyer fined 12 Lakh for slow over rate in IPL 2025 : आयपीएल २०२५ च्या हाय-व्होल्टेज सामन्यात, पंजाब किंग्जच्या संघाने चेन्नई सुपर किंग्जला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत करण्यात यश मिळवले. पंजाब संघाने हा सामना ४ विकेट्सनी जिंकला. पंजाबकडून त्यांचा स्टार फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलने हॅटट्रिक घेतली. कर्णधार श्रेयस अय्यरनेही ७२ धावांची मॅच विनिंग खेळी खेळली. मात्र, असे असूनही, श्रेयस अय्यरला त्याच्या मोठ्या चुकीबद्दल बीसीसीआयने दंड ठोठावला आहे.
श्रेयस अय्यरला ठोठावला दंड –
पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरला स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला आहे. या हंगामात पंजाब किंग्जची ही पहिली चूक होती. त्यामुळे श्रेयस अय्यरला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. या सामन्यात प्रभसिमरन सिंगचे अर्धशतक आणि युझवेंद्र चहलची हॅटट्रिक देखील पाहण्यासारखी होती. पंजाबने सीएसकेचा चार विकेट्सने पराभव केला आणि त्यांना प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर काढले. सामन्यानंतर अय्यर म्हणाला की त्याला धावांचा पाठलाग करायला आवडते.
Shreyas Iyer was fined INR 12 lakh as Punjab Kings committed their first over-rate offence of the IPL 2025 season under Article 2.22 of the Code of Conduct.#ShreyasIyer #IPL2025 pic.twitter.com/jCro4tXTwH
— CricTracker (@Cricketracker) May 1, 2025
निर्धारित वेळेत षटके पूर्ण न केल्याने दंड –
आयपीएलच्या नियमांनुसार श्रेयस अय्यरवर हा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलच्या नियम २.२ नुसार, जर एखाद्या संघाने निर्धारित वेळेत षटके पूर्ण केली नाहीत तर त्या संघाच्या कर्णधाराला दंड आकारला जातो. सामना जिंकल्यानंतर अय्यर म्हणाला की त्याला मोठ्या धावांचा पाठलाग करायला आवडते. तो म्हणाला, ‘मला कोणत्याही मैदानावर धावांचा पाठलाग करायला आवडते. विशेषता जेव्हा धावसंख्या मोठी असते.
हेही वाचा – RR vs MI : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! स्टार खेळाडू IPL 2025 मधून पडला बाहेर
सामन्याबद्दल बोलायचे तर प्रथम फलंदाजी करताना चेन्नई संघाने सॅम करनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर सर्वबाद १९० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पंजाब किंग्ज संघाने श्रेयस अय्यर आणि प्रभसिमरन सिंग यांच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर १९.४ षटकांत ६ गडी गमावून १९६ धावा करत विजयावर शिक्कामोर्त केला.





