Dhoni Jersey Retires : सीएसकेने घेतला ऐतिहासिक निर्णय! सचिन, डिव्हिलियर्स अन् रसेलनंतर आता धोनीचा मोठा सन्मान
Dhoni Jersey Retires : महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर, सीएसकेने त्याच्या सन्मानार्थ त्याचा ७ क्रमांकाचा जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने २०२० मध्येच धोनीचा जर्सी क्रमांक निवृत्त केला होता.

CSK Retires MS Dhoni Number 7 Jersey IPL Tribute : आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या एमएस धोनीच्या अद्वितीय योगदानाचा गौरव करण्यासाठी सीएसकेने(CSK) एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ‘टेलिग्राफ इंडिया’च्या वृत्तानुसार, फ्रँचायझीने धोनीची आयकॉनिक ‘नंबर ७’ जर्सी कायमची निवृत्त केली आहे. २००८ पासून तब्बल १९ वर्षे सीएसकेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि संघाला पाच विजेतेपदे मिळवून देणाऱ्या ‘थला’साठी बीसीसीआयने २०२० मध्ये घेतलेल्या निर्णयाच्या पावलावर पाऊल ठेवत सीएसकेने हा सन्मान दिला आहे.
धोनीने ७ नंबरचीच जर्सी का निवडली होती? स्वतः केला होता खुलासा
धोनीने एका कार्यक्रमात आपल्या ७ नंबरच्या जर्सीमागील खास कारण सांगितले होते. त्यांचा जन्म ७ जुलै (सातवा महिना) १९८१ रोजी झाला असून, ८ वजा १ बरोबर ७ असे समीकरण जुळत असल्याने त्यांनी हाच क्रमांक निवडला होता; जो पुढे जाऊन जगभरातील कोट्यवधी क्रिकेटप्रेमींसाठी एक भावना बनला.
सीएसकेसाठी सर्वाधिक सामने आणि पाच आयपीएल ट्रॉफींचा विक्रम –
💛One jersey
💛One number
💛One emotionMS DHONI – No. 7
A number that will live forever in the hearts of CSK fans.
LEGENDS NEVER FADE. #7 FOREVER! 🦁💛
#MSDhoni #ChennaiSuperKings #IPLRetentions #IPL2027 #Thala #Dhoni #csk https://t.co/h6AF4aifFU
— Gowtham (@GowthamDheeran) November 17, 2026
चेन्नई सुपर किंग्ससाठी सर्वाधिक सामने खेळणारा धोनी हा फ्रँचायझीकडून सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज आहे. त्याच्या प्रभावी नेतृत्वाखाली चेन्नईने तब्बल १३ वेळा प्लेऑफमध्ये प्रवेश केला, ज्यातील ११ वेळा अंतिम सामना गाठत पाच वेळा चॅम्पियन होण्याचा मान मिळवला; तसेच सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांमध्येही त्याचे नाव आघाडीवर आहे.
सचिन तेंदुलकरपासून आंद्रे रसेलपर्यंत; यापूर्वी चार जर्सी झाल्या आहेत निवृत्त –
You only chance to own a piece of Captain Cool’s legacy 😲
MS Dhoni’s own match-issued, personally signed jersey — complete with documented proof and provenance.
Serious Collectors only, DM @StellagraphShop to express interest. 😍✨ https://t.co/iJBBWXyX5i
— Stella Collectibles (@StellagraphShop) March 1, 2026
महेंद्रसिग धोनीपूर्वी आयपीएलमधील तीन फ्रँचायझींनी चार जर्सी निवृत्त केल्या आहेत. सर्वप्रथम मुंबई इंडियन्सने २०१३ मध्ये सचिन तेंदुलकरची १० नंबरची जर्सी निवृत्त केली, त्यानंतर २०२३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने एबी डिव्हिलियर्सची १७ आणि ख्रिस गेलची ३३३ नंबरची जर्सी हटवली.
२०२६ मध्ये केकेआरनेही दिला होता आंद्रे रसेलला असाच खास सन्मान –
END OF AN ERA 🥹💔
Captain Cool MS Dhoni retires from IPL after 5 IPL Titles & a legendary run with CSK. Mahi made yellow immortal. 👏🙌
Thank you, Thala. Jersey No.7 Forever, now mentor. 💛
#MSDhoni #IPL2027 #WhistlePodu #ChennaiSuperKings #ForOurThala https://t.co/G4GcyATCwM
— Gaurav Singhal (@ImGauravS16) November 17, 2026
२०२६ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सने अष्टपैलू आंद्रे रसेलच्या मॅचविनिंग कामगिरीच्या सन्मानार्थ त्याची १२ नंबरची जर्सी निवृत्त केली होती. आता या प्रतिष्ठित यादीत एमएस धोनीच्या ७ नंबरच्या जर्सीचाही समावेश झाला असून, भविष्यात चेन्नईचा कोणताही खेळाडू हा क्रमांक परिधान करणार नाही.





