आयईडी स्फोटात सीआरपीएफ जवान शहीद
Updated On:

रांची – झारखंडमध्ये नक्षलविरोधी कारवाईदरम्यान आयईडी स्फोटात जखमी झालेला सीआरपीएफ जवान शहीद झाला. हेड कॉन्स्टेबल महेंद्र लस्कर असे शहीद झालेल्या जवानाचे नाव आहे. पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील जराईकेला पोलीस स्टेशन हद्दीतील बाबुडेरा-समता अक्षातील नक्षलवादी हिंसाचारग्रस्त भागात निमलष्करी दल ऑपरेशन राबवित असताना नक्षलींनी पेरलेल्या आयईडीचा स्फोट झाला. या स्फोटात दोन जवान जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता महेंद्र लस्कर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.




