पिंपरी | कार्ला – भाजे परिसरात पर्यटकांची गर्दी

कार्ला, (वार्ताहर) – सलग तीन सुट्ट्यांमुळे रविवारी (दि. १६) कार्ला – भाजे लेणी परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पर्यटकांसोबतच एकवीरा देवीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक कार्ला गडावर आले होते. त्यामुळे वाहनांची संख्या वाढली अन् कार्ला फाटा येथे मोठी वाहतूक कोंडी झाली. ती दूर करण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.
रविवार असल्याने कार्लागडावरील एकवीरा देवीच्या दर्शनासाठी ठाणे, मुंबई, कोकण भागातून मोठ्या संख्येने भाविक गडावर आले होते. त्यामुळे दर्शनासाठी मोठी रांग लागली होती. दर्शन लांबल्याने गर्दीचा झाली.
परिणामी जुन्या पुणे – मुंबई महामार्गावर वाहनांची संख्या वाढू लागल्याने कार्ला फाटा येथे वाहतूक कोंडी झाली. लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरिक्षक किशोर धुमाळ, सहायक पोलीस निरिक्षक भारत भोसले, किशोर शिवते यांनी ही कोंडी सोडविली.





