Pune District : पेमदरा परिसरात पावसाअभावी पिके करपली
Pune District : शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने लागवड केलेली पिके पावसाअभावी पूर्णपणे करपून गेली आहेत.

बेल्हे : पावसाने दडी मारल्याने जुन्नर तालुक्यातील पेमदरा परिसरातील शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेली पिके पाण्याअभावी जळून गेली असून, आता पाऊस पडला तरी या पिकांना त्याचा फारसा फायदा होणार नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने लागवड केलेली पिके पावसाअभावी पूर्णपणे करपून गेली आहेत.
शासन व प्रशासनाने या नुकसानीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत व पीक नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ठका दाते, शिवराम बेलकर, ज्ञानदेव तांबोळी, प्रकाश बेलकर, भिमा दाते, दत्तात्रय दाते, मछिद्र दाते, सुनिल दाते, पोपट दाते, पंढरीनाथ दाते, तान्हाजी दाते, राजू दाते, प्रशांत दाते, बाळासो दाते, विलास दाते, आदेश बेलकर, दिलीप बेलकर, गुलाब बेलकर, आकाश बेलकर, विठ्ठल बेलकर, पंढरीनाथ बेलकर, चंद्रकांत बेलकर, जिजाभाऊ बेलकर, देवराम दाते, शिवाजी दाते व इतर शेतकऱ्यांनी केली आहे.
वेळेवर पाऊस न मिळाल्याने हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली आहेत. आता पाऊस आला तरी जळालेल्या पिकांना त्याचा उपयोग होणार नाही. जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देऊन तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी दोन दिवसांत करण्यात येणार आहे.
-आनंदा बेलकर, प्रगतशील शेतकरी, पेमदरा.





