VIDEO : तहानलेल्या हत्तीवर मगरीचा हल्ला; थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई – जंगलातील प्राण्यांनी एकमेकांवर केलेल्या हल्ल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. सध्या असाच एक थरारक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पाणी पिण्यासाठी आलेल्या हत्तीच्या कळपावर एका मगरीने हल्ला केल्याचे दिसते.
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते की, हत्तींचा कळप एका नदीच्या काठावर जाऊन पाणी पित आहेत. मात्र, याच वेळी या हत्तींपैकी एका छोट्या हत्तीवर पाण्यातील मगरीने हल्ला केला आहे. या मगरीने आपल्या जबड्यामध्ये हत्तीची सोंड पकडली. त्यानंतर ती मगर हत्तीला पाण्यात खेचण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, हत्ती बलशाली असल्यामुळे तो मगरीला दाद देत नाहीये.
तसेच अचानकपणे झालेल्या हल्ल्यामुळे व्हिडीओतील हत्तींचा कळप बिथरून गेल्याचे दिसते. व्हिडीओतील हत्ती मोठ्याने ओरडत असल्याचे आपल्याला दिसत आहेत. तसेच यावेळी कळपातील एक मोठा मगरीकडे धावून गेल्याचेही आपल्याला दिसतेय. या मोठ्या हत्तीने छोट्या हत्तीला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रयत्न शेवटी यशस्वी झाला असून छोटा हत्ती मगरीच्या तावडीतून सुटला आहे.
पाहा व्हिडीओ –
https://twitter.com/irsankurrapria/status/1403223078893621248
दरम्यान, हा व्हिडीओ कोणत्या जंगलातील आणि कोणत्या ठिकाणचा आहे हे निश्चितपणे समजू शकलेले नाही. मात्र, त्याला आयआरएस ऑफिसर अंकुर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच चांगलाच व्हायरल झाला असून याची समाजमाध्यमांवर चांगलीच चर्चा सुरु आहे.





