राष्ट्रपतींवर टीका करणं भोवलं; अखेर सोनिया गांधींविरोधात तक्रार दाखल

FIR Against Sonia Gandhi | संसद अधिवेशनाचा प्रारभ राज्यसभा आणि लोकसभेच्या संयुक्त बैठकीतील राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने झाला. त्या अभिभाषणावर चर्चा करत सोनिया, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि त्यांच्या भगिनी प्रियंका संसदभवनातून बाहेर पडले.
अभिभाषण नीरस वाटले का, अशी विचारणा राहुल त्यांच्या मातोश्री सोनियांना करत होते. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी गाठले. बिचाऱ्या महिला, राष्ट्रपती अभिभाषणाच्या अखेरीस अतिशय थकलेल्या वाटत होत्या. त्यांना अतिशय प्रयत्नपूर्वक बोलावे लागत होते, अशी प्रतिक्रिया सोनिया गांधी यांननी दिली. त्यावरून भाजपच्या विविध नेत्यांनी कॉंग्रेस आणि सोनियांवर टीकेची झोड उठवली.
सुधीर कुमार ओझा यांनी दाखल केली तक्रार
यातच आता शनिवारी राज्यसभेचे सदस्य आणि कॉंग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि खासदार प्रियंका गांधी यांच्याविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार सुधीर कुमार ओझा यांनी दाखल केली आहे. सुधीर कुमार ओझा मुझफ्फरपूरमधील रहिवासी आहेत. ते मुझफ्फरपूरच्या दिवाणी न्यायालयात वकील आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर अध्यक्ष द्रौपदी मुर्मू यांच्याविरूद्ध कथित आक्षेपार्ह वक्तव्याचा आरोप करण्यात आला आहे. यासाठी, कोर्टाने सुनावणीची तारीख 10 फेब्रुवारी रोजी निश्चित केली आहे.
मुझफ्फरपूरचे वकील सुधीर ओझा यांनी म्हटले आहे की, ‘1 फेब्रुवारी रोजी वृत्तपत्रांमधील बातमी वाचली. यामुळे स्वत: ला खूप अपमानित वाटले. असे विधान देशातील राष्ट्रपतींना अपमानित करण्याच्या उद्देशाने करण्यात आले आहे. यामुळे केवळ राष्ट्रपती नव्हे तर संपूर्ण देशाचा अपमान झाला आहे.’ FIR Against Sonia Gandhi |
पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?
आपण देशाचे मालक असल्याचे कॉंग्रेसजनांना वाटते. कॉंग्रेसच्या शाही (गांधी) परिवाराचा अहंकार पुन्हा उघड झाला. राष्ट्रपतींनी संसदेत अभिभाषण केले. विकसित भारतासाठीचे व्हिजन, देशाची कामगिरी यावर त्या बोलल्या. त्यांनी अतिशय प्रेरणादायी भाषण केले. मात्र, शाही परिवाराने त्या भाषणाला कंटाळवाणे म्हटले. राष्ट्रपतींचा उल्लेख गरीब, थकलेल्या असा करण्यात आला. ते उल्लेख देशातील आदिवासींचा, गरिबांचा अपमान करणारे आहेत, असा शाब्दिक हल्लाबोल मोदींनी केला. FIR Against Sonia Gandhi |
राष्ट्रपती भवनने व्यक्त केली नाराजी
कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या टिप्पणीविषयी नाराजी व्यक्त करणारे निवेदन राष्ट्रपती भवनने जारी केले. संबंधित टिप्पणी राष्ट्रपती पदाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचवणारी असल्याने अस्वीकारार्ह आहे. अयोग्य, दुर्दैवी टिप्पणी कुठल्याही स्थितीत टाळायला हवी. हिंदीसारख्या भारतीय भाषांच्या शैलीविषयी अनभिज्ञता असल्याने काहींचा अभिभाषणाविषयी चुकीचा भ्रम झाला असावा. काही नेत्यांना वाटते त्याप्रमाणे राष्ट्रपती बिल्कूल थकलेल्या नव्हत्या. वंचित समुदाय, महिला आणि शेतकऱ्यांसाठी बोलणे कधीच थकवणारे नसते अशी राष्ट्रपतींची भावना आहे, असे त्या निवेदनात नमूद करण्यात आले.
हेही वाचा:
“लाथ मारणं, हुज्जत घालणं भोवलं…” ; शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाड निलंबित, सर्वात मोठी कारवाई





