Criminal Record MP: गुन्हे दाखल असणारे खासदार ‘मालामाल’; पक्षनिहाय आकडेवारी पहा

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता लोकसभा, राज्यसभेतील खासदारांबाबत माहिती समोर येऊ लागली आहे. कोणत्या खासदारांवर किती गुन्हे दाखल आहेत तर कुणाकडे किती संपत्ती आहे. द असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या अहवालानुसार, लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची सरासरी मालमत्ता 38.33 कोटी रुपये आहे.
यातही ज्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल आहेत त्यांची मालमत्ता 50.03 कोटी तर गुन्हे दाखल नसलेल्या खासदारांची मालमत्ता सरासरी 30.50 कोटी आहे. याबाबत आणखी बाब म्हणजे देशातील खासदारांपैकी सर्वाधिक श्रीमंत खासदार हे तेलंगणा राज्यातील असून, यामध्ये महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे.
याच अहवालानुसार सध्या लोकसभा आणि राज्यसभेतील एकुण खासदारांपैकी सर्वाधिक श्रीमंत खासदार हे भाजप पक्षाचे असल्याची माहिती समोर आली आहे.
यामध्ये भाजपचे 385, त्यानंतर टीआरएसचे 26, वायएसआरसीपीचे 31, कॉंग्रेसचे 81, आपचे 11 डीएमकेचे 34, शिरोमणी अकाली दलचे 2 राजदचे 6 तर अपक्ष 6 खासदारांचाही यामध्ये समावेश आहे. भाजपमधील 14 खासदार हे अब्जाधीश आहेत. तर आयएसआरसीपी आणि टीआरएसचे प्रत्येकी 7, कॉंग्रेसचे 6, आम आदमी पक्षाचे 3 आणि राजदचे 2 खासदार हे अब्जाधीश असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्य – खासदार – एकूण संपत्ती (रुपये)
तेलंगणा – 24 – 6 हजार कोटी 294 लाख
आंध्रप्रदेश – 36 – 5 हजार कोटी 427 लाख
उत्तर प्रदेश – 108 – 3 हजार कोटी 340 लाख
महाराष्ट्र – 65 – 1 हजार कोटी 181 लाख
पंजाब – 20 – 1 हजार कोटी 778 लाख
कर्नाटक – 39 – 1 हजार कोटी 339 लाख
मध्यप्रदेश – 40 – 1 हजार कोटी 311 लाख
तामिळनाडु – 57 – 1 हजार कोटी 203 लाख
गुजरात – 37 – 1 हजार कोटी 178 लाख
प. बंगाल – 58 – 1 हजार कोटी 50 लाख





