Pimpari News : गहाण सोने सोडविण्याच्या बहाण्याने 5 लाखांची फसवणूक
बॅंकेत गहाण ठेवलेले सोने सोडविण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची पाच लाख दहा हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना (Pimpari News) १५ मे ते २० मे दरम्यान जनता सहकारी बॅंक, चिंचवड येथे घडली.

Pimpari News : बॅंकेत गहाण ठेवलेले सोने सोडविण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची पाच लाख दहा हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना (Pimpari News) १५ मे ते २० मे दरम्यान जनता सहकारी बॅंक, चिंचवड येथे घडली.
या प्रकरणी सुजितकुमार काकासाहेब भोसले, (वय ४०, रा. आंबेगाव पठार) याांनी पिंपरी (Pimpari News) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रशांत मोहन गायकवाड (वय ३५, रा. खेड, राजगुरुनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी प्रशांत गायकवाड याने फिर्यादी यांना बॅंकेत गहाण ठेवलेले सोने सोडविण्याच्या बहाण्याने कर्जाची रक्कम पाच लाख दहा हजार रुपये घेऊन येण्यास सांगितले.
फिर्यादी सोबत सदर व्यवहाराचे लेखी करार करुन फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन फिर्यादीची रक्कम आरोपीच्या जनता सहकारी बॅंकेमध्ये असलेल्या स्वत:च्या बॅंक खात्यात भरण्यास भागड पाडले. गहाण सोने न सोडविता परस्पर बॅंकेतून निघून जावून फसवणूक केली.






