Mother Daughter Suicide : राजगुरुनगर हादरलं! पोटच्या मुलीसह आईची विहिरीत उडी; आत्महत्येमागचं ‘हे’ कारण ऐकून संताप अनावर होईल
Mother Daughter Suicide : राजगुरुनगर परिसरात संतापाची लाट; ३५ वर्षीय महिलेने चिमुकलीसह संपवले जीवन, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात.

Mother Daughter Suicide : खेड तालुक्यातील राजगुरूनगर परिसरात कौटुंबिक छळाच्या पार्श्वभूमीवर एका महिलेने आपल्या लहान मुलीसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. लक्ष्मण अश्रुबा कुमटकर (सध्या रा. राजगुरुनगर, मूळ गाव. जामखेड) याच्या विरोधात खेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पीडित महिलेचे वडील अशोक अंबादास भोसले (रा. खांडवी, जि. अहिल्यानगर) यांनी खेड पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची मुलगी संजीवनी लक्ष्मण कुमटकर (वय 35, रा. राजगुरूनगर, ता. खेड) हिला तिचा पती लक्ष्मण अश्रुबा कुमटकर याच्याकडून गेल्या अनेक वर्षांपासून मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागत होता. मुलगा होत नसल्याच्या कारणावरून वारंवार शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केली जात असल्याचा आरोप तक्रारीत केला आहे.
नवऱ्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून संजीवनी यांनी गुरुवारी (दि.३०) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास राक्षेवाडी येथील विहिरीत लहान मुलीसह उडी घेत आत्महत्या केली. याप्रकरणी आरोपी पती लक्ष्मण कुमटकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार गरड हे करत आहेत.





