Crime News : अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी संशयितास अटक
Updated On:

नागठाणे – सातारा तालुक्यातील बोरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बोरगाव पोलिसात गुरूवारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयितास अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयिताने गोडीगुलाबीने बोलून स्वत:च्या घरी नेऊन चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेल्या तीन चार महिन्यात वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली.
त्यातून ती गरोदर राहिली. याबाबत सर्व घटना मुलीच्या आईला समजली. आज आईने दिलेल्या फिर्यादीवरून संशयिताविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. परिविक्षाधिन पोलिस उपनिरीक्षक श्रीमती जयस्वाल तपास करत आहेत.





