Crime News : पोलीस दलात खळबळ ! नवी मुंबईमध्ये सहाय्यक उपनिरीक्षकाची आत्महत्या
नवी मुंबई विशेष शाखेत कार्यरत असलेल्या पांडुरंग निंबा पाटील या सहाय्यक उपनिरीक्षकाने (एएसआय) ऐरोली येथील एका लॉजमध्ये आत्महत्या (Crime News) केल्याची घटना समोर आली आहे.

Crime News : नवी मुंबई विशेष शाखेत कार्यरत असलेल्या पांडुरंग निंबा पाटील या सहाय्यक उपनिरीक्षकाने (एएसआय) ऐरोली येथील एका लॉजमध्ये आत्महत्या (Crime News) केल्याची घटना समोर आली आहे. त्यांनी आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओ संदेश आणि चिठ्ठी लिहून ठेवली असून, त्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांवर छळ केल्याचा आरोप केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पांडुरंग पाटील हे शनिवारी दुपारनंतर एका लॉजमध्ये वास्तव्यासाठी आले होते. बराच वेळ दरवाजा ठोठावूनही प्रतिसाद न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी (Crime News) मास्टर कीच्या साहाय्याने खोली उघडली. तेव्हा ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने वाशी येथील रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पोलिसांना सापडलेल्या व्हिडिओ संदेशात आणि चिठ्ठीत पाटील यांनी तीव्र मानसिक आणि व्यावसायिक तणावाचा उल्लेख केला आहे. तसेच एका माजी पोलीस उपायुक्तासह (डीसीपी) सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) आणि इतर वरिष्ठ सहकाऱ्यांकडून पद्धतशीरपणे मानसिक छळ (Crime News) केला जात असल्याचे त्यात म्हटले आहे.
पाटील यांनी आपल्या कुटुंबीयांची माफी मागितली आणि नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांना या प्रकरणाची चौकशी करून आपल्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची विनंती केली.
दरम्यान, मृत पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांनी (Crime News) रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. आरोपी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांनी नकार दिला. चिठ्ठीत ज्यांची नावे आहेत, त्यांना त्वरित निलंबित करून अटक करावी, अशी मागणी त्यांच्या पत्नी आणि मुलीने केली आहे.





