नेवासा : नवी मुबंई येथील पनवेल कामोठे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बालकाचे झालेले अपहरण आणि पोलीसांनी ताब्यात घेतलेले सर्व अपहरणकर्ते. कुकाणे येथील या घटनेने अ.नगर जिल्हा हादरला खरा पण स्वतःचा मुलगा ताब्यात घेण्यासाठी पती – पत्नीतला हा वाद उघड होताच या अपहरण नाट्याचा उलगडा पनवेल मधील कामोठे पोलिसांना झाल्याने पोलीसांच्या साक्षीने अपहरण झालेला बालक अपहरणकर्त्या वडीलांच्या हाती सुखरूप ताब्यात मिळाला. या प्रकरणात नगर व पनवेल पोलीस यंत्रणेला मात्र मोठा मन:स्थाप झाला. कामोठे येथून सात वर्षाच्या अपहरण झालेल्या बालकाची अ.नगर गुन्हे शाखा व श्रीरामपूर शहर पथकाकडून सुटका तसेच कुकाण्यातील पाच जण आरोपी असे वृत्त येताच नेवासा तालुक्यात मोठी खळबळ उडालेली होती. या प्रकरणी अ.नगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला व पनवेल पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर यांनी लक्ष घालत अपहरणकर्ते अहिल्यानगर जिल्ह्यात येत असल्याचे कळविल्यामुळे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा कमालीची सतर्क झालेली होती. श्रीरामपूर जवळ नगरच्या गुन्हे विभाग व श्रीरामपूर पोलिसांनी एका वाहनातून या सर्वाना अखेर ताब्यात घेतले व पनवेलला पाठवून दिले मात्र कामोठे पोलीस ठाण्यात खऱ्या प्रकाराचा उलगडा होताच सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. यातील गणेश विलास इंगळे हे अपहरण झालेल्या मुलाचे तर अपहरणकर्त्यातील विलास रामू इंगळे हे गणेश याच्या वडिलांचे नांव तर कैलास रामू इंगळे हा गणेश याचा चुलता व बाबासाहेब चिनप्पा फुलमाळी हा या दोघांचा नातलग हे तिघेही साखर कारखान्यावर उस तोड मजूर आहेत तर अक्षय आबासाहेब म्हस्के हा केवळ मित्र म्हणून वाहनात गेलेला तर प्रसाद गंगाधर कुटे याचे भाडोत्री वाहन होते. विलास व त्याची पत्नी यांच्यात गेल्या पाच वर्षांपासून वाद असल्यामुळे ती पनवेलला राहते. याच परिसरसातून तिने मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदविल्याने पोलीस यंत्रणा हदरली होती. आई फिर्यादी अपहरण झालेला मुलगा व अपहरणकर्ता बाप असे हे अपहरण नाट्य गेल्या सोळा ऑक्टोबर रोजी याच फिर्यादीने तीच्या मुलास कुकाणे प्राथमिक शाळेतून पतीस न सांगता पनवेलला नेले होते तसे सिसिटीव्ही फुटेजही या प्राथमिक शाळेतून प्राप्त झालेले आहे. त्यावेळीही मोठा गदारोळ उठल्यामुळे शाळेतील शिक्षकांना थेट पनवेलला जावून वारी करत याच अपहरण झालेल्या मुलास कुकाण्यात आणावे लागलेले होते व पालकाच्या स्वाधीन करावे लागले होते. भर वर्गातून दुपारी हा विध्यार्थी फिर्यादी आईने नेला तरीही शाळेने गांभीर्य दाखवलेले नव्हते नाही तर प्रकारच घडला नसता पालकाने ओरड केल्यानंतर वर्गशिक्षकाने पनवेल गाठले होते. या प्रकरणाची कल्पना शिक्षण विभागास व कुकाणे पोलीस ठाण्यास देण्यात आलेली नव्हती त्यामुळे येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही या प्रकरणाचून पुढे आलेला आहे. या बालक अपहरण प्रकरणी आम्ही कोणावरही कारवाई किंवा अटक केली नाही. पती,पत्नीत समन्वयाचा प्रयत्न केला जात आहे प्रियंका खरटमल (सहायक पोलीस निरीक्षक, कामोठे पोलीस ठाणे पनवेल मुंबई)