Crime News : अट्टल गुन्हेगार सचिन कातेला अटक; शेवगाव पोलिसांची मोठी कारवाई
खुनाचा प्रयत्न, दरोडा तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत दाखल गंभीर गुन्ह्यात (Crime News) फरार असलेल्या आरोपीला शेवगाव पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून अटक केली. या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर वचक बसला आहे.

Crime News : खुनाचा प्रयत्न, दरोडा तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत दाखल गंभीर गुन्ह्यात (Crime News) फरार असलेल्या आरोपीला शेवगाव पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून अटक केली. या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर वचक बसला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन काते (रा. सामनगाव, ता. शेवगाव) याच्याविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. खुनाचा प्रयत्न, दरोडा व मोक्का कायद्यानुसार कारवाई झाल्यानंतर आरोपी फरार (Crime News) झाला होता. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी शेवगाव पोलिसांनी विशेष पथक कार्यरत केले होते.
तपासादरम्यान मिळालेल्या तांत्रिक माहिती व गोपनीय बातमीच्या आधारे आरोपीचा ठावठिकाणा निश्चित करण्यात आला. त्यानंतर पोलिस पथकाने नियोजनपूर्वक कारवाई करत आरोपीला ताब्यात घेत अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीविरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह मोक्का कायद्यान्वये गुन्हे दाखल आहेत.






