Crime News : सामुहिक बलात्कार प्रकरणी पाच जणांना अटक; आग्रातील धक्कादायक प्रकार

आग्रा (उत्तर प्रदेश) – उत्तर प्रदेशातील आग्रा येथील हॉटेलमध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी आज सांगितले.
पोलिसांनी सांगितले की त्यांना शनिवारी रात्री उशिरा पीडितेचा फोन आला, त्यानंतर त्यांनी ही महिला जिथे थांबली होती त्या होमस्टेवर धाव घेतली आणि आरोपींवर कारवाई केली.
श्रीमंत होमस्टे या रिसॉर्टवर हा प्रकार घडला आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित आरोपींवर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तेथून पाच जणांना अटक केली आहे.
सदर पीडित तरुणी हॉटेलची कर्मचारी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या आरोपींनी संबंधीत महिलेवर हल्लाही केला असून त्याचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. या प्रकरणाची पुर्ण शहानिशा केली जात असल्याचेही पोलिसांनी सांगितले.





