Crime News : तब्बल 163 अल्पवयीन मुलांची सुटका; पोलिसांची मोठी कारवाई
बिहारमधून महाराष्ट्रातील लातूर येथे मजुरीसाठी आणण्यात येत असलेल्या १६३ अल्पवयीन मुलांची (Crime News) मध्य प्रदेशातील कटनी रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी सुटका केली आहे.

Crime News : बिहारमधून महाराष्ट्रातील लातूर येथे मजुरीसाठी आणण्यात येत असलेल्या १६३ अल्पवयीन मुलांची (Crime News) मध्य प्रदेशातील कटनी रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी सुटका केली आहे. ही कारवाई पाटणा-पूर्णा एक्स्प्रेसमध्ये करण्यात आली असून, या प्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे.
बाल कल्याण समितीकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, रेल्वे सुरक्षा दल आणि शासकीय रेल्वे पोलीस (Crime News) यांनी शनिवारी रात्री कटनी स्थानकावर संयुक्त मोहीम राबवली. ही सर्व मुले ६ ते १३ वयोगटातील असून ती बिहारच्या अरारिया भागातील रहिवासी आहेत. त्यांना स्लीपर कोचमधून अत्यंत दाटीवाटीने नेले जात होते.
कटनी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर ही कारवाई करण्यात आली. एकाच डब्यात तब्बल ५० हून अधिक मुले बसवण्यात आली होती. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही पालकांशी (Crime News) संपर्क साधला असता त्यांनी मुलांना शिक्षणासाठी पाठवल्याचे सांगितले. मात्र ही तस्करीची साखळी असल्याची दाट शक्यता असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
या कारवाईत या मुलांकडे किंवा त्यांना सोबत नेणाऱ्यांकडे प्रवासाची कोणतीही अधिकृत कागदपत्रे किंवा तिकिटे आढळली नाहीत. अटक करण्यात आलेल्या आठही आरोपींनी प्राथमिक चौकशीत धक्कादायक माहिती दिली आहे.
या मुलांना लातूर येथील एका मदरशात शिक्षणासाठी नेले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, प्राथमिक तपासात या मुलांचा वापर मजुरीसाठी केला जाणार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या आठही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १४३(४) अंतर्गत बाल तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






