Nagar | नेवासा, पारनेरमध्ये अवैध धंद्यावर गुन्हे शाखेचे छापे

नगर (प्रतिनिधी) – खासदार नीलेश लंके यांच्या आंदोलनानंतर पोलीस प्रशासनाने अवैध धंद्याविरोधात कंबर कसली असून जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध धंद्यावर कारवाईचा सपाटा लावला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नेवासा व पारनेर तालुक्यातील अवैध देशी, विदेशी दारु तसेच कल्याण मटका जुगार अशा 5 ठिकाणी छापे टाकुन अवैध धंद्यावर कारवाई करत ५ आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून ३२ हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सुरज हरिश वरखडे (वय १८, रा. निघोज, ता. पारनेर) (हॉटेल साहिल), ज्ञानेश्वर जबाजी कवाद (वय ३८, रा. निघोज, ता. पारनेर (हॉटेल ग्रीनपार्क), यांच्यावर पारनेर पोलीसा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर प्रमोद भाऊसाहेब मेथे (वय ५०, रा. मोहिनीराज मंदीरा शेजारी, नेवासा), संतोष लक्ष्मण कणगरे (वय 30, रा. नेवासा बुा, ता. नेवासा), सुरेश रामदास बोरुडे (वय ६२, रा. मुकींदापुर, ता. नेवासा) यांच्यावर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यांच्याकडून ३२ हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार पथकाने कारवाई केली.





