Pune : स्वारगेट प्रकरणातील पीडितेशी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी साधला संवाद; पण ‘त्या’ प्रश्नावर पोलीसही निरुत्तर….

पुणेः स्वारगेट बलात्कार प्रकरणात दररोज नवे खुलासे होत आहेत. सदर गुन्हा स्वारगेट पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. हा गुन्हा पुणे गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचे आदेश पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले होते. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे.आरोपी दत्तात्रय गाडे विरोधात विविध पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी गाडेची तब्बल तीन तास कसून चौकशी केली असून गाडे पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत असल्याची ताजी माहिती आहे. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पीडित तरुणीशी संवाद साधला आहे.
पण पीडितेने अधिकाऱ्यांना विचारलेल्या प्रश्नावर अधिकारी निरुत्तरीत झाले आहे. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पीडितेशी संवाद साधला. त्यावेळी माझ्या बदनामीला जबाबदार कोण? असा प्रश्न अधिकाऱ्यांना तिने विचारला. तिच्या या प्रश्नावर पोलिस अधिकारी निरुत्तर झाले.
स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला पोलिसांनी त्याच्या मूळ गावी गुनाट येथील शेतातून बेड्या ठोकल्या. यानंतर या प्रकरणात अनेक धक्कादायक माहिती समोर येत गेली. अशातच या घटनेतील पीडितेवरच अनेकांनी संशय व्यक्त केला. गाडे आणि पीडित तरुणीची पूर्वीची ओळख असल्याचा दावा देखील करण्यात आला. सोशल मीडियावर हा विषय चर्चाचा बनला. यामुळे पीडित तरुणीला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. यातच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तिच्याशी संवाद साधल्यानंतर तिने माझ्या बदनामीला जबाबदार कोण? असा प्रश्न केल्याने अधिकारी देखील निरुत्तर झाले.
गाडेच्या कारनाम्यांची लिस्ट मोठी
आरोपी दत्तात्रया गाडे हा गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. आरोपीचा स्वारगेट सह सोलापूर, अहिल्यानगर आणि पुणे शहरातील शिवाजीनगर एसटी स्थानकात वावर असायचा. तसेच लिफ्टच्या बहाण्याने अनेकांची लूट त्याने केली आहे. ज्येष्ठांना त्यांनी पैशांचा गंडा घातला आहे. याशिवाय शिरुरमधील एका लॅाजबाहेर बसून विवाहबाह्य संबंध असणाऱ्या महिलांना ब्लॅकमेल केल्याचेही समोर आले आहे. तसेच पैशांसाठी त्याने समलिंगी संबंध ठेवल्याचेही माहिती आहे. थोडक्यात गाडेच्या कारनाम्यांची लिस्ट मोठी आहे, त्यातील अजून अनेक कारनामे बाहेर येणार असल्याचे सांगितले जाते.





