पुणे -विवाहितेचा मानसिक छळ केल्याप्रकरणी चौघांविरुध्द हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पती सासर, सासू, नणंद यांचा समावेश आहे. एका 29 वर्षीय विवाहितेने दिलेल्या तक्रारीनूसार पती प्रविण गौतम गायकवाड, सासरे गैतम गायकवाड, सासू आणि नणंद (सर्व रा.नऱ्हे, आंबेगाव) यांच्यावर कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल झाला आहे.
यातील आरोपी फिर्यादीला माहेरुन सदनिका घेण्यासाठी पैसे आण म्हणून वारंवार शिवीगाळ व मारहाण करत होते. यानंतर काही दिवसांनी पती बंगलोरला नोकरीसाठी जात असल्याचे सांगून फिर्यादीस माहेरी सोडून निघून गेला. मानसिक व शारिरिक छळ केल्याप्रकरणी फिर्यादीने तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक लाड करत आहेत.