जडेजाचा महिला पोलिसाशी वाद
Updated On:

राजकोट – भारतीय संघातील क्रिकेटपटू रवींद्र जडेजा नव्या वादात अडकला आहे. मास्क न घातल्याने त्याला एका महिला पोलिसाने रस्त्यात अडवले व त्याच्याकडे दंड भरण्याची मागणी केल्यानंतर हा वाद सुरू झाला.
करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे तसेच मास्क घालणे बंधनकारक असताना जडेजा, त्याची पत्नी व गाडीतील अन्य सदस्यांनी मास्क घातले नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर महिला पोलिसाने त्यांना अडवले व त्यांनी केलेल्या चुकीची जाणीव करून दिली.
जडेजाची पत्नी रिवाबा व महिला पोलीस अधिकारी सोनल गोसाई यांनी एकमेकांविरोधात तक्रार दिली आहे. गाडीत असलेल्या जडेजाच्या पत्नीनेच केवळ मास्क घातला नव्हता असा दावा करण्यात येत असून याबाबत महिला पोलीस अधिकारी लवकरच आपली बाजू मांडणार आहेत.





