Nitish Rana : ‘लवकरच येत आहेत दोन छोटे टीममेट्स…’, ‘हा’ स्टार क्रिकेटपटू लवकरच होणार ‘बापमाणूस’; शेअर केली खास पोस्ट

Nitish Rana is going to become a father of twins : आयपीएल २०२५ पूर्वी नितीश राणाने आनंदाची बातमी दिली आहे. नितीश राणाची पत्नी सांची मारवाह गर्भवती आहे. दोघेही लवकरच जुळ्या मुलांचे पालक होणार आहेत. नितीश आणि सांची यांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे याची माहिती दिली आहे. आयपीएलमध्ये बराच काळ कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या नितीश राणाने आपल्या पत्नीसोबतचा फोटो शेअर करून ही माहिती दिली. ३१ वर्षीय नितीश आयपीएलच्या आगामी हंगामात केकेआरऐवजी राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसणार आहे.
डावखुरा स्फोटक फलंदाज नितीश राणाने इन्स्टाग्रामवर पत्नी साची मारवाहसोबतचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले, ‘स्टेडियमपासून साइट व्हिजिटपर्यंत, आता आमच्या सर्वात मोठ्या प्रोजेक्टवर लवकरच दोन छोटे टीममेट्स येत आहेत!’ नितीशने फोटो शेअर करताच, चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा पाऊस पाडला आहे.नितीश हा एक स्फोटक फलंदाज आहे आणि त्याचबरोबर तो पार्टटाइम ऑफ स्पिनर देखील आहे. २०१५-१६ च्या हंगामात त्याने दिल्लीसाठी उत्कृष्ट कामगिरी केली होता. तो मैदानावरील त्याच्या वादांसाठी देखील ओळखला जातो.
View this post on Instagram
नितीश राणा आणि सांची मारवाहची प्रेमकथा –
नितीश राणा आणि सांची मारवाह यांची प्रेमकथा खूपच फिल्मी आहे. दोघांची भेट एका पार्टीत झाल्याचे वृत्त आहे. नितीश राणा पहिल्याच नजरेत सांची मारवाहच्या प्रेमात पडला होता. यानंतर, दोघांची भेट होऊ लागली आणि २०१८ मध्ये त्यांनी साखरपुडा केला. त्यानंतर दोघांनी जवळपास एका वर्षानंतर २०१९ मध्ये लग्न केले.
नितीश राणा आयपीएलमध्ये खेळताना दिसणार –
कोलकाता नाईट रायडर्सचा माजी कर्णधार नितीश राणा यंदा आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे. कारण यावर्षीच्या आयपीएल लिलावात राजस्थान रॉयल्सने खरेदी केले आहे. नितीशला राजस्थानने ४.२० कोटी रुपयांना खरेदी केले आहे. डावखुरा फलंदाज आता आयपीएलमध्ये शानदार कामगिरीची तयारी करत आहे.





